शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…
जळगाव (Jalgaon) : शासनातर्फे 1 रुपयात पिकविमा भरलेल्या तब्बल 33 हजार अर्ज हे बोगस आढळले असून हे अर्ज बोद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmers) चिंतेचे वातावरण आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिकविमा योजना (Crop Insurance Scheme) ही एक महत्वाची मदत ठरली आहे, परंतु या योजनेत गैरव्यवहार झाल्याची प्रकरणं उघडकीस आली असून आता ही योजना बंद करण्याबाबतची शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं राज्य सरकारला दिल्याची माहिती आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत होता, कारण विमा हप्ता सरकार भरणार असल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त एक रुपया द्यावा लागत होता. मागच्या वर्षी 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. परंतु आता या योजना बंद होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. कृषी आयुक्तांच्या (Commissioner of Agriculture) अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एका समितीने शेतकऱ्यांना 1 रुपयांत पिकविमा योजना बंद करून त्या ऐवजी एका पिकविम्याच्या अर्जामागे किमान 100 रुपये भरावे अशी शिफारस समितीने केलेली आहे. त्यामुळे आता यावर महायुती सरकार (Grand Alliance Government) काय निर्णय घेईल हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
सर्वाधिक बोगस अर्जदार असलेले जिल्हे कोणते?
दरम्यान, या योजनेचा गैरफायदा घेतबीडमध्ये सर्वाधिक 1 लाख 9 हजार 264 बोगस अर्ज करण्यात आलेले आहेत. तर सातारा 53 हजार 137 जळगाव 33 हजार 786, परभणी 21 हजार 315, सांगली 17 हजार 217, अहिल्यानगर-16 हजार 864, चंद्रपूर – 15 हजार 555, पुणे – 13 हजार 700, छत्रपती संभाजीनगर – 13 हजार 524 शेतकऱ्यांचे बोगसअर्ज आढळून आले आहेत.
ओरीसामध्ये झाली होती बंद…
ओडिशा सरकारने (Odisha Govt) योजना बंद केली होती. ओडिशामध्येही पीक विमा घोटाळ्याचे अनेक प्रकार समोर आले होते. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झाले. यावर पर्याय म्हणून ओडिशा सरकारने योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. यातच आता महाराष्ट्रात (Maharashtra) ही योजना वादग्रस्त ठरत असल्यामुळे योजना बंद करण्याची मागणी होत आहे.