जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली या अफवेनंतर 30 ते 35 जणांनी रेल्वेमधून खाली उड्या मारल्या. मात्र समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडलं आहे.
जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली या अफवेनंतर 30 ते 35 जणांनी रेल्वेमधून खाली उड्या मारल्या.
मात्र समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडलं आहे. भीषण अपघात घडला आहे.
या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, या अपघातामध्ये सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाहीये.
पुष्पक एक्स्प्रेसच्या चालकानं अचानक ट्रेनचं ब्रेक दाबलं, त्यामुळे चाकातून आगीच्या ठिणग्या उडाल्या, त्यामुळे ट्रेनला आग लागल्याचा समज काही प्रवाशांचा झाला.
आग लागल्याची अफवा पसरताच भीतीमुळे 30 ते 35 जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. मात्र समोरून बंगळूरू एक्स्प्रेस येत होती, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.
या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत, जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
पुष्पक एक्स्प्रेस ला पाचोरा रेल्वे स्थानकात आणण्यात आली आहे, तर बंगळूरू एक्स्प्रेस अद्यापही घटनास्थळीच आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.