चादर विक्रेत्याच्या मदतीने मध्यप्रदेशातून पिस्तूल खरेदी:दोन आरोपी एलसीबी आणि शिरूर पोलिसांकडून जेरबंद

2 hours ago 1
परप्रांतीय चादर विक्री करणार्‍याचा मदतीने मध्यप्रदेश येथून गावठी पिस्टल आणार्‍या दोघांना एलसीबी आणि शिरूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख २ हजार किंमतीची ५ गावठी पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. अनिकेल विलास गव्हाणे (वय २०, गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, अहमदनगर), मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २०, रा. जवळा, ता. पारनेर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिरुर बायपास रस्त्यालगत असणार्‍या दि नाना स्पॉट हॉटेल जवळ दोघे जण उभे आहेत. त्यांच्याकडे गावठी पिस्तूल असून ते विक्रीसाइी आणले असल्याचे माहिती शिरुर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दोघांना सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांची अंगझडती घेतती असता त्यांच्याकडे ५ गावठी पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे सापडले. यानंतर आरोपी गव्हाणे यांच्याकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की, तो एका हॉटेल मध्ये काम करत असतांना त्याची एका चादर विक्रेत्याशी ओळख झाली होती. त्यावेळी त्याने मध्यप्रदेश मध्ये पिस्तूल मिळते ते तुम्ही चांगल्या किंमतीला विकु शकता असे सांगितले. यानंतर गव्हाणे यांने खुपटे याला सोबत घेत सेंधवा मध्यप्रदेश येथून गावठी पिस्तूल खरेदी केले. गावठी पिस्तूलची विक्री करुन जास्त पैसे कमवता येतील यासाठी एक महिन्यापूर्वी पिस्तूल खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, एसडीपीओ प्रशांत ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलिस अंमलदार नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, विजय शिंदे, परशुराम सांगळे, निरज पिसाळ आदींच्या पथकाने केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article