चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनांतर्फे आज दर्यापूर बंद:उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार
4 hours ago
1
तालुक्यातील वरुड कुलट येथे एका ६५ वर्षीय नराधमाने तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार केला. या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली. रविवारी येवदा पोलिस स्टेशनवर धडक देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच येवदा ठाणेदार विवेक देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. दरम्यान सोमवारी याच घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय, सामाजिक संघटनांच्या वतीने दर्यापूर बंद ठेवण्यात येणार आहे. या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अश्विनी देवके, जिल्हाध्यक्ष डॉ. अंजली जवंजाळ, जि.प. माजी सदस्या शिवानी अग्रवाल, वंदना करुले, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष जयश्री चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष शिल्पा लोडम व महिला उपस्थित होत्या. दरम्यान येवदा व दर्यापूर पोलिस ठाण्याअंतर्गत तीन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला. या दोन्ही घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. दरम्यान अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार, २० जानेवारीला सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती ते उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)