कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उतरणार आहे. या स्पर्धेत रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला होणार असल्याचं क्रीडाप्रेमी म्हणत आहे. रोहित शर्माचा फॉर्म यासाठी कारणीभूत ठरणार आहे . रोहित शर्माच्या मागच्या 16 डावात पूर्ण फेल गेला आहे. त्याला फक्त एकदाच अर्धशतक ठोकता आलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात फक्त 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने क्रीडाप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू आर अश्विन यानेही भाकीत वर्तवलं आहे. भारतीय कर्णधाराला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी फलंदाजीने उत्तर देणं भाग असल्याचं म्हंटलं आहे. या माध्यमातून टीकाकारांची तोंडं बंद होतील असं त्याने सांगितलं आहे.
अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितलं की, ‘हे सोपं नाही. रोहित शर्माच्या नजरेतून पाहिल्यास हे खरंच निराशाजनक आहे. तो मालिकेवर लक्ष केंद्रित करु इच्छित आहे. त्याला माहिती आहे की त्याने या फॉर्मेटमध्ये चांगलं केलं आहे आणि तो चांगली करू इच्छितो.’ असं सांगत आर अश्विनने टीकाकारांबाबतही आपलं म्हणणं मांडलं आहे. ‘लोकं तर प्रश्न विचारणारच.. क्रिकेट पाहणारे निश्चित याबाबत विचारणा करणार.. हा कठीण काळ आहे. तुम्ही प्रश्नांचा भडिमार रोखू शकत नाही. कधीपर्यंत थांबणार? तर तुम्ही जिथपर्यंत चांगली कामगिरी करत नाही तोपर्यंत असंच चालणार.’
‘क्रिकेटपटू म्हणून मी रोहित शर्मा कोणत्या काळातून जात आहे हे समजू शकतो. हे सोपं नाही. मी प्रार्थना करतो तो चांगली कामगिरी करेल आणि या मालिकेत शतक ठोकेल.’ असंही आर अश्विन म्हणाला. इतकंच काय तर अश्विनने मीडियावरही टीकास्त्र सोडलं.
आर अश्विनने रवींद्र जडेजाच्या कामगिरीचं कौतुक केलं. त्याने पहिल्या वनडे सामन्यात 26 धावा देत तीन विकेट घेतल्या. ‘आमचा मिडिया जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याची स्तुती करण्यास अयशस्वी ठरतो. पण जेव्हा पराभूत होतो तेव्हा प्रत्येक खलनायक होतो. त्याने जो रूटला बाद केलं. जडेजा खेळाच्या प्रत्येक प्रसंगात उपलब्ध असतो.’