छत्तीसगडमध्ये जंगलामध्ये तैणात असलेले सुरक्षा दलाचे जवानANI
Published on
:
16 Nov 2024, 6:46 am
Updated on
:
16 Nov 2024, 6:46 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील कांकेर नारायणपूर सीमेवरील अबुझमधच्या जंगलात शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यामध्ये दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी शुक्रवारी (दि.15) रात्री शोध मोहीम राबवली. यावेळी नक्षलवाद्यांना निष्प्रभ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोळीबाराचा समावेश असलेली ही एक मोठी चकमक कारवाई असल्याचे अहवालात म्हटले आहे.
मागील काही दिवसांपुर्वी छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात चकमकीत ठार झालेल्या प्लॅटून कमांडरसह 8 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या तीन नक्षलवाद्यांचे सुरक्षा दलांनी मृतदेह जप्त केले होते. या परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे, असे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले.