Published on
:
03 Feb 2025, 11:48 pm
Updated on
:
03 Feb 2025, 11:48 pm
लंडन : जगभरातील निरनिराळ्या देशांत प्रत्येकाचे वेगवेगळे चलन असते. भारतात रुपया आहे, तर बांगला देशात टका नावाचे चलन आहे, तर थायलंडला बाथ, तर अमेरिकेतली डॉलर प्रसिद्ध आहे. युरोपियन देशात पाऊंड आणि युरोचा बोलबाला आहे. प्रत्येक देशाची करन्सी त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. दुसर्या देशात जेव्हा कोणी पोहोचले तर त्यांना करन्सी एक्स्चेंज करावी लागते; परंतु जगात एक असाही देश आहे, जेथील करन्सी एकदम ‘रद्दी’ आहे. जर तुम्ही येथील बाजारात वस्तू विकत घ्यायला गेला, तर करन्सी रद्दीच्या भावात वजन करून घेतली जाते. या स्वयंघोषित देशाचे नाव “सोमालीलँड” असे आहे.
सोशल मीडियावर या देशातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात हा दावा केला आहे. सोमालीलँडची अधिकृत करन्सी सोमालीलँड शिलिंग आहे. या व्हिडीओत सांगितले जात आहे की, येथील चलन इतके घसरलेले आहे की त्यांची मोजणी करण्याऐवजी त्यांना तराजूने तोलले जाते. सोमालीलँड असून हा देश स्वत:ला स्वतंत्र मानतो; परंतु जगाने त्याला स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेला नाही. आफ्रिकेच्या पूर्वेला असणार्या सोमालीलँडचे क्षेत्रफळ कमी आहे. साल 1991 मध्ये सोमालिया गृहयद्धात बुडाला होता. तेव्हा सोमालीलँडने स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले होते. हा देश 1 लाख 37 हजार चौरस फुटापर्यंत पसरला आहे. येथील लोकसंख्या अवघी 40 लाख आहे. येतील चलन वेगळीच आहे. येथे लोक चलनाला भाजीसारखे विकत घेतात. येथे 1 अमेरिकन डॉलरचे सुमारे 570 सोमाली शिलिंगच्या बरोबरीचे असते. सोमालीलँडवर एका अमेरिकन डॉलरची किंमत 10 हजार ते 11 हजार सोमालीलँड शिलिंग एवढी होते. त्यामुळे लोक पैसे मोजत बसण्याऐवजी थेट वजनाने तोलण्यावर भरोसा आहे. जर भारताचे शंभर रुपये येथे नेले, तर त्या बदल्यात 12 हजार सोमालीलँड शिलिंग मिळतील.