जलसंधारणातून ग्रामविकासाचा चमत्कार:अरुणाचल प्रदेशचे सचिव तथा निवडणूक निरीक्षक ताय काये यांचे मत
1 day ago
2
जलसंधारणासह गावाचा लोकसहभागातून साचेबद्ध विकास करण्याची किमया नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजारने साधली. येथे झालेली कामे, पाहून हा ग्रामविकासाचा चमत्कार असल्याचे मत अरूणाचल प्रदेश राज्याचे सचिव तथा निवडणूक निरीक्षक ताय काये यांनी मांडले. १९७२ च्या दुष्काळानंतर हिवरेबाजार गावात ज्वारी व बाजरी ही मुख्य पीके बनली होती. पावसाचे प्रमाण २०० ते ४०० मिलीमीटर असूनही त्यावेळी स्थलांतराची वेळ यायची. परंतु, १९८९ नंतर हिवरे बाजार हे गाव एका वेगळ्या कार्यासाठी ओळखले जाऊ लागले. पद्मश्री पोपट पवार यांच्या प्रयत्नांमुळे, गावात ग्रामविकास आराखडा तयार झाला. जलसंधारणाचे नियोजन करून गावात पहिले पाणी आले. तर समपातळी चर खोदून, कुरण विकास झाला. रोजगार उपलब्धीकडे लक्ष दिले. लोकसहभागाच्या आणि सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाचे कामे झाल्याने गावाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. हे गाव राज्यासह देशभरात ग्रामविकासाचे एक मोठे उदाहरण म्हणून पुढे आले आहे. यापार्श्वभूमीवर सिक्कीम येथील सचिवांनी ग्रामविकासाच्या कामांची पाहणी केली. ताय काये हे सध्या पारनेर विधानसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणूनही काम पाहात आहेत. याप्रसंगी ताय काये म्हणाले, हिवरे बाजारसारखी ग्रामविकासाची कामे देशातल्या प्रत्येक गावात व्हावा. या गावातील शेतकऱ्यांसह तळागाळातील प्रत्येक माणूस समृद्ध आहे. गावात एकता आणि समानता व मानवता आहे. प्रत्येकजण एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होतात. कमी पाऊस पडूनही इथली भूमी जलसमृद्ध आहे. इथले डोंगर वृक्षसमृद्ध आहेत आणि इथली माणसे सामाजिक दृष्ट्या समृद्ध आहेत ते पाहून मला आनंद झाला असे त्यांनी व्यक्त केले. पद्मश्री पोपट पवार यांनी त्यांना ग्रामविकासाबाबत माहिती दिली. अमिषाला बळी न पडता करा मतदान पद्मश्री पवार बुधवारी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. कोणत्याही आमिषाला बळी न पडता सर्वांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पद्मश्री पोपट पवार यांनी यावेळी केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)