राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांना नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबीर आहे. कोणाही व्यक्तीचं शिबीर नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबीर आहे. कोणाही व्यक्तीचं शिबीर नाही. काल प्रफुल्ल पटेल हे मला येऊन भेटले. त्यांनी दोन तास चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडावेळ यायला हवं. सुनील तटकरे यांनीही सांगितलं की तुम्ही थोडावेळ या, असे छगन भुजबळ म्हणाले.
मला त्यांनी विनंती केली होती की थोडावेळ तरी या. म्हणून मी आलेलो आहे. याचा अर्थ सर्व काही स्वच्छ झालं असं होत नाही. राज्यसभेवर जायचं की नाही, असा प्रस्ताव नाही. येवला सोडून मी जाऊ शकत नाही. अजित पवारांनी कोणताही संपर्क केलेला नाही, असेही छगन भुजबळने म्हटले.