Saif Ali Khan onslaught FIR Details : बॉलिवडूचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याला दोन दिवस उलटले. पण हल्लेखोर काही गवसला नाही. पण त्या रात्री, भल्या पहाटे वांद्रेतील सदगुरू शरण इमारतीच्या 12 व्या मजल्यावर घडले तरी काय? हल्लेखोराच्या निशाण्यावर होते तरी कोण?
सैफ अली खान, एलियामा फिलीप
छोटा नवाब सैफ अली खान याची नवीन वर्षाची सुरूवातच धक्कादायक झाली. नवीन वर्षाला 15 दिवस उलटत नाही तोच त्याच्यावर बाका प्रसंग ओढावला. दोन दिवसांपूर्वी 16 जानेवारी रोजी त्याच्या घरात शिरून चोरट्याने जोरदार हंगामा केला. त्याच्यावर चाकूने सपासप 6 वार केले. त्यातील दोन वार तर जणू त्याच्या जीवावर उठले. नशीब बलवत्तर म्हणून संकट टळले. त्या रात्री, भल्या पहाटे वांद्रेतील सदगुरू शरण इमारतीच्या 12 व्या मजल्यावर घडले तरी काय? हल्लेखोराच्या निशाण्यावर होते तरी कोण? काय सांगतो FIR?
कोणी दिली तक्रार?
सैफ अली खान याच्यावर 16 फेब्रुवारी रोजी भल्या पहाटे 2 ते 2:30 वाजेदरम्यान हल्ला झाला. मानेवर आणि इतर ठिकाणी खोल जखमा झाल्याने त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पाठीत रूतलेला चाकूचा तुकडा शस्त्रक्रियेने काढण्यात आला. या सर्व घटनेची फिर्याद, सैफ याच्या घरातील स्टाफ नर्स एलियामा फिलीप यांनी दिली. तिनेच पहिल्यांदा या चोराला पाहिले होते. तिच्यावर हल्लेखोराने पहिला वार केला होता.
हे सुद्धा वाचा
एलियामा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ती गेल्या चार वर्षांपासून सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्याकडे काम करते. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे घरात सैफ याचे कुटुंब 11 व्या आणि 12 व्या माळ्यावर राहते. 11 व्या मजल्यावर तीन रूम आहेत. त्यातील एक रूम सैफ आणि करीनाची आहे. दुसऱ्या रूमध्ये तैमूर आणि त्याची देखभाल करणारी आया गीता राहते. तिसऱ्या रूमध्ये लहान मुलगा जहागीर उर्फ जयबाबा आणि त्याच्या देखभालीसाठी एलियामा आणि जुनू राहतात.
बातमी अपडेट होत आहे…