महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते अजित पवार नाराज आहेत. अनेकदा त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांचा होत असलेल्या अजित पवार गटाच्या शिर्डीतील अधिवेशनाला भुजबळ हजर राहणार का याकडे सर्वांच्या नजरा होता. अखेर नाराज भुजबळांची पावले शिर्डीकडे वळली. मात्र माध्यमांशी बोलताना त्यांच्या मनातील नाराजी काही लपून राहिली नाही.
हे पक्षाचे शिबिर असून कुणा एका व्यक्तीचे नव्हे, असे म्हणत भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावरील नाराजीही अप्रत्यक्षपणे व्यक्ती केली. विशेष म्हणजे माध्यमांशी बोलताना त्यांनी अजितदादांचा उल्लेखही टाळला.
खासदार प्रफुल्ल पटेल हे गुरुवारी येऊन बसले होते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अधिवेशनाला येण्याची विनंती केली. त्यामुळे मी अधिवेशनाला उपस्थित राहिले. आलो असलो तरी अधिवेशनात पूर्ण वेळ थांबणार नाही. थोडावेळ थांबून परत जाणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
हा आमचा अंतर्गत विषय
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेल यांनीही भाष्य केले असून हा आमचा अंतर्गत विषय असून त्यावर नक्की मार्ग काढू असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली. भुजबळ यांची नाराजी टोकाची नाही. आम्ही त्यावर नक्की मार्ग काढू, असे ते म्हणाले.
धनंजय मुंडे परळीतच
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मात्र शिर्डीतील अधिवेशनाला दांडी मारली आहे. त्यांची तब्येत बरी नसल्याचे कळते. तत्पूर्वी सुनील तटकरे यांनी मात्र भुजबळ आणि मुंडे दोघेही अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे म्हटले होते.