जिल्ह्यात रब्बी पीक विमा अर्ज भरण्यास सुरूवात:पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; 15 डिसेंबरपर्यंतची मुदत
11 hours ago
1
खामगाव बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू, कांदा व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा काढता येणार आहे. पीक विमा काढण्यास मागील १ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. पीक विमा काढण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबरपर्यंत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शासनाने यावर्षीपासून शेतकऱ्यांसाठी खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांसाठी एक रुपयात पीक विमा ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणी विविध रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतंर्गत मदत मिळू शकते. तसेच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस किंवा दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीच्या आत पीक विमा काढून घेण्याचे फायदेशिर ठरणार आहे. यंदा पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात गरजेपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामातील पिकांवर आहे. रब्बी पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक विमा काढणे आवश्यक आहे. गहू, कांदा व हरभऱ्याचा पीक विमा १ नोव्हेंबर ते १५ िडसेंबरपर्यंत, तर रब्बी ज्वारीचा विमा ३० नोव्हेंबरपर्यंत काढता येणार आहे. शेतकऱ्यांना सीएससीवर भरता येईल अर्ज रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन शेतकरी पीक विमा अर्ज भरू शकतात. तसेच बँका, विमा प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांना आपला अर्ज दाखल करता येणार आहे. पिकांसाठी आहे ७० टक्के जोखीमीची अट खरीप हंगामात शेतकऱ्यांनी एका पिकासाठी एक रुपया भरुन विका काढला होता. शेतकऱ्यांचा प्रिमीयम केंद्र व राज्य शासनाने पीक विमा कंपनीला दिला आहे. त्यामुळे अग्रीमची रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे. सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांना विमा रक्कम दिली जाणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)