जीवनाला सुरळीतपणे चालवण्यासाठी व्यवहार, परमार्थाचा समतोल आवश्यक:प्रजापिता ब्रह्माकुमारी अकोला शाखेचा सुवर्ण जयंती महोत्सव उत्साहात

2 hours ago 2
‘दुसऱ्याच्या कल्याणातच आमचे स्वतःचे कल्याण सामावलेले आहे. जसे चालण्यासाठी दोन्ही पायांची आवश्यकता असते तसेच जीवनाला सुरळीतपणे चालवण्यासाठी व्यवहार आणि परमार्थाचा ताळमेळ राखण्याची पण खूप आवश्यकता आहे,’ असे प्रबोधन राजयोगीनी संतोष दीदी यांनी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारीज अकोला शाखेचा सुवर्ण जयंती महोत्सव रविवारी, २४ नोव्हेंबरला शुभमंगल हॉलमध्ये साजरा केला. याप्रसंगी सर्वप्रथम नाशिक येथील गायक बी. के. ओंकारभाई कडवे यांच्या आध्यात्मिक भक्तीगीतांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर मुख्यालय माउंट आबू येथील राजयोगी आत्मप्रकाश भाईजी यांचे अनुभव युक्त मार्गदर्शन लाभले. त्यानंतर राजयोगीनी संतोष दिदी, संयुक्त प्रशासिका, ब्रह्माकुमारीज माउंट आबू यांचे स्वागत केले.या वेळी मंचावर संतोष दिदींसह अकोला सबझोनच्या संचालिका रुक्मिणी दिदी, राजयोगीनी रजनी दिदी , सीता दीदी , मंगला दीदी यवतमाल, वंदना दीदी , आशा दीदी , जयंतीदीदी , मुख्यालय माउंट आबू येथील राजयोगी आत्मप्रकाश भाईजी, दिवाकरभाई, रवीभाई, नेमिचंद भाई, अशोकभाई, नरेंद्रभाई, राहुलभाई, रमेशभाई, विष्णुभाई उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अनुप धोत्रे, सुहासिनी धोत्रे, डॉ. रतन राठोड मुंबई उपस्थित होते. रूक्मीणीदीदींनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अकोला सबझोनने मागील ५० वर्षांत केलेल्या सेवेची माहिती डॉक्युमेंटरीद्वारे दाखवली. गणमान्य संस्थानी मोमेंटो देऊन रुक्मिणी दीदींचा सन्मान केला. संतोष दीदी पुढे म्हणाल्या, परमपिता परमात्मा शिवच्या आठवणीने, त्यांच्या संगाचा रंग आम्हा आत्म्यांवर चढतो, व जेव्हा योग अग्नी प्रज्वलित होते तेव्हा विकारांची अग्नी शांत होतो. काटा काढण्यासाठी काट्याचा उपयोग होतो. त्याचप्रकारे योग अग्नी विकारांची आग शांत करते. जेव्हा विकारांची आग शांत होते तेव्हा आमचे सुक्ष्म आणि स्थूल अंग शीतल होते. परमात्मा शिव जेव्हा या पृथ्वीवर अवतरित होतात तेव्हा ते ज्ञान जलाने आमचे असे सिंचन करतात की, त्यांच्या शितलतेने आमचे मन शीतल होत जाते. आम्ही जितकी दुसऱ्यांची सेवा करतो तितकी परिपक्वता आमच्यात येते. दुसऱ्यांना क्रोधमुक्त किंवा मोहमुक्त करण्या अगोदर आम्हांला तसे बनावे लागेल. जेव्हा आम्हाला राजयोग मेडीटेशनचा फायदा होतो व आमचे जीवन सुखी व शांत होते तेव्हा आम्हाला अशी जाणीव होते की, हे सारे विश्वच आमचा परिवार आहे. तेव्हा या विश्वाला सुखमय व शांत बनवण्यासाठी राजयोग मेडिटेशनद्वारे परमात्माच्या प्राप्तीचा मार्ग दाखवू शकतो. यानंतर आत्मप्रकाशभाईजी, डॉ. रतन राठोड, रजनी दीदी, सीतादीदी, जयंती दीदी, दिवाकरभाई, रवीभाई, नेमिचंदभाई यांनी या गोल्डन ज्युबिली महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन बी. के. वर्षादीदी, आभार बी. के. प्रमिला दीदी यांनी केले. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अकोला, वाशीमचा ब्रह्माकुमारी परिवार उपस्थित होता. या वेळी खासदार अनुप धोत्रे म्हणाले की, इतिहासात भारताची ओळख सोने की चिडीया म्हणून होती. भारताला पुन्हा तसे घडवायचे असेल तर किमान ५० टक्के हिस्सा हा महिलांच्या विकासाकरिता असला पाहिजे आणि ब्रह्माकुमारीज संस्थेचे मुख्य ध्येय सुद्धा हेच आहे. आम्ही ब्रह्माकुमारीजकडून जीवनात साधेपणा आणि शांती हे दोन गुण नेहमी ग्रहण करीत असतो. ब्रह्मकुमारी संस्थेचे कार्य महिलांसाठी श्रेष्ठ : खा. अनुप धोत्रे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article