Mamta Kulkarni: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेल्या ममता कुलकर्णी हिने महाकुंभ 2025 दरम्यान स्वतःचं पिंडदान करत संन्यास स्वीकारला आहे. आता किन्नर आखड्यातील महामंडलेश्वर झाल्यापासून ममता तुफान चर्चेत आाहे. बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना ममता हिच्याबद्दलचे सर्व किस्से आता पुन्हा समोर येत आहेत. यशाच्या शिखरावर असताना अभिनेता बॉबी देओल याने ममताला अभिनेत्याने ‘वन-नाइट स्टँड’साठी विचारलं होतं. शिवाय हॉटेलमध्ये एका प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्याने दोघांची भेट घडवून दिली होती.
सांगायचं झालं तर, ममता कुलकर्णी हिने 90 च्या दशकात अभिनेता शाहरुख खान, सलमान खान यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. दरम्यान, एका मुलाखतीत ममताने धक्कादायक खुलासा केला. बॉबी देओलने एकदा ‘वन-नाइट स्टँड’साठी विचारलं होतं… असं अभिनेत्री म्हणाली.
ममताने खुलासा केला की, ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा बॉबी ‘बरसात’ सिनेमाची शुटिंग करत होता आणि ममता देखील अन्य सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. एका दोघांची भेट एका हॉटेलमध्ये अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी घडवून दिली. पहिल्या भेटीनंतर बॉबी आणि ममता यांच्यात मैत्री झाली.
मैत्री झाल्यानंतर बॉबी याने ममता कुलकर्णी हिला ‘वन-नाइट स्टँड’साठी विचारलं. अभिनेत्याने एका रात्रीसाठी विचारतात अभिनेत्री बॉबीसमोर एक अट ठेवली. पण तेव्हा बॉबी देओल अभिनेत्री पूजा भट्ट हिला डेट करत होता. ममता म्हणाली, ‘जर तू तुझ्या गर्लफ्रेंडकडून परवानगी घेशील त्यानंतर मी यावर विचार करेल…’ असं अभिनेत्री म्हणाली.
सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ममता हिने तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ममता कुलकर्णी हिची चर्चा सुरु आहे. दरम्यान, अभिनेत्रीला महामंडलेश्वर करण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला होता.
आखाड्यातील अनेक सदस्यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे ममताची नियुक्ती करणाऱ्या आचार्य महामंडलेश्वर यांच्यासोबतच ममता यांनाही पदावरून हटवण्यात आले. याप्रकरणी अनेकांनी टीका केली आहे. योगगुरु रामदेव बाबा आणि धीरेंद्र शास्त्री यांनी देखील ममता कुलकर्णी हिचा विरोध केला. पण त्यांना देखील ममता कुलकर्णी हिने सडेतोड उत्तर दिलं.