श्रीवर्धन मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ म्हसळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना शरद पवार.pudhari
Published on
:
17 Nov 2024, 4:00 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:00 am
म्हसळा : ज्यांच्या पाठीशी शक्ती उभी केली त्यांनी फक्त कुटुंबाचा विकास केला मुलाला आमदार केले, मुलीला मंत्री केले, भावाला, पुतण्याला आमदार केले,अजून काय करायला पाहिजे होते असा सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खा.सुनील तटकरे यांना नामोल्लेख टाळून विचारला. माझा नाद करायचा नाही खड्यासारखे बाजूला करू असा इशाराही त्यांनी दिला. श्रीवर्धन मतदार संघात ते बोलत होते.
म्हसळा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत पवार बोलत होते.आमचेच सहकारी यांनी स्वार्थासाठी भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत येण्यासाठी आमची फसवणुक केली असल्याचा घणाघात खासदार सुनिल तटकरे यांचे नाव न घेता पवारांनी केला आहे.
मागील 10 वर्षे लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या हातात पूर्ण बहुमताचे सरकार असताना पुन्हा त्यांना सन 2024 च्या निवडनुकित 400 चा आकडा पार करण्याचा प्रयत्न होता . याचे कारण त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली देशाची आदर्श घटना बदल करायची होती पण आम्ही त्यांचा स्वप्न हाणून पाडला असल्याचे त्यांनी सुचित केले. राज्यात वर्षभरात 67 हजार 381 महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत तर 63 हजार महीला बेपत्ता झाल्याची नोंद आहे.तरुण मुला मुलींच्या हाताला काम नाही,दर्जेदार शिक्षण मिळत नाही,महागाईचा भडका उडाला आहे.शेतकर्यांचे पिकाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी करीत असलेल्या आत्महत्या आदी बाबींवर शरद पवारांनी या सभेत कटाक्ष टाकला.
राज्यात आजच्या बहिणींची अवस्था पाहून यांना राज्य चालविण्याचा अधिकार नाही. म्हणूनच यांच्या हातात पुन्हा सत्ता येता कामा नये असे या निवडणुकीत काम करा आणि आघाडीला निवडूण आणण्याचे त्यांनी जाहीर आवाहन केले .उमेदवार अनिल नवगणे यांनी श्रीवर्धन मतदार संघात विकासाचे मुद्द्यावर होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी आणि येथे होणारे स्थलांतर रोखून येथेच रोजगार निर्मिती करण्यासाठी मला मत देवुन आमदार निवडून आणण्यासाठी भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
या सभेला शरद पवार गटाचे वगळता महाआघाडीतील शेकाप,शिवसेना (ठाकरे) काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते अनुपस्थित होते. यामुळे सभेत आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. म्हसळा दिघी रोड येथे संपन्न झालेल्या जाहीर सभेत त्यांचे समावेत माजी आमदार तुकाराम सुर्वे, शाम भोकरे, ज्ञानदेव पवार,श्रीमती जाधव,तालुका अध्यक्ष सुरेश कुडेकर, कृष्णा म्हात्रे, विशाल सायकर, कौस्तुभ करडे, रविंद्र चव्हाण,सेना संघटक रविंद्र लाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे ता.अध्यक्ष अझहर धनसे,विजय तोडणकर,नदीम दफेदर,हेमंत नाक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीसांकडून निवडणुकीला धार्मिक रंग
सातारा : व्होट जिहाद शब्द वापरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. विधानसभेला आपल्याला यश येणार नाही याची खात्री झाल्याने ते हिंदू-मुस्लिम विषय घेऊन बोलत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमधील वातावरण खराब करत आहेत. मात्र त्यांचा हेतू साध्य होणार नाही, असा टोला खा. पवार यांनी सातार्यात लगावला.