टाळ मृदंगाचा गजर; वरूर जऊळका येथे कार्तिकी सोहळा:श्री विठ्ठलाच्या भक्तीमध्ये वारकरी रमले , महाप्रसादाचेही भाविकांना केले

3 hours ago 1
वरूर जऊळका येथील कार्तिकी सोहळ्यात भाविक भक्त सहभागी झाले. या परिसराला मोठ्या यात्रेचे स्वरुप आले होते. टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी विठ्ठल भक्तिमध्ये रममाण झाले होते. या सोहळ्याचा श्रीगणेशाचा शुक्रवारी ८ नोव्हेंबरला झाला होता. तुळशीसह विष्णू सहस्त्रनामावली सोमवार ११ ते शुक्रवार १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. या सोहळ्यात काकडा, श्री विष्णू सहस्त्रनाम, तुळशी पत्र पूजा, ज्ञानेश्वरी प्रवचन सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन झाले. गुरुवारी १४ नोव्हेंबर रोजी बाहेरगावाहून दिंड्याचे गावांमध्ये आगमन झाले. दिंड्या मंदिरात एकत्रित आल्यानंतर संस्थानमध्ये नाव नोंदणी होवून सेवाभावी व संस्थांमध्ये दिंड्याचे मुक्काम झाले. रात्री गावांमध्ये विठ्ठल रखुमाईचा गजर ऐकावयास मिळत होता. सोहळ्यात युवा भक्तगणांनी दिंडीतील वारकऱ्यांना चहा- फराळाचे वितरण केले होते. असा झाला समारोप शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर पाणी शिंपडून रांगोळया काढल्या. दिंड्या मंदिरात एकत्रित जमा झाल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेऊन ग्राम प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. संस्थांनचे अध्यक्ष एकनाथ महाराज पवार व त्यांची पत्नी विजया पवार यांच्या हस्ते ‘श्रीं्’ अभिषेक करून पूजा करण्यात आली. दिंडीतील भक्तांना सन्मान करण्यात आला. त्यानंतर हभप त्र्यंबक महाराज अवारे सोनबर्डी यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण केले. मुखात विठ्लाचे नाम, हातात टाळ मृदंग,भगव्या पताका व महिलांच्या डोक्यावर तुळस , अशा वातारणात दिंडी काढण्यात आली. सोहळ्याला आले यात्रेचे स्वरूप या सोहळ्याला पाळणी,लहान मुलांचे विविध खेळण्याच्या साहित्याचे, विविध साहित्य विक्रीची दुकानेही होती. या सोहळ्याला यात्रेचे स्वरूप आले होते. सोहळ्यात राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article