निपाणी : चोरट्यांनी कारखाना कार्यस्थळावरून लांबवलेला हाच तो ट्रॅक्टर व ट्रॉली.Pudhari File Photo
Published on
:
01 Feb 2025, 1:07 am
Updated on
:
01 Feb 2025, 1:07 am
निपाणी : हालशुगर कारखाना कार्यस्थळावरुन चोरट्यांनी लांबविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांनी अवघ्या 13 दिवसात तपास लावला. चोरट्यांनी ट्रॅक्टर मनोचीवाडी येथील दगड खणीत लपवला होता. दरम्यान पोलिसांनी संशयितांचा शोध जारी ठेवला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, माणकापूरमधील (ता. निपाणी) मारुती तुकाराम बन्ने यांचा ट्रॅक्टर व दोन ट्रॉली 14 रोजी लांबविण्यात आल्या होत्या. याबाबत त्यांनी? ? जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी बसवेश्वर चौक पोलिसात फिर्याद दिली होती. फिर्यादीत त्यांनी 8 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व दोन ट्रॉली चोरीस गेल्याचे नमूद केले होेते. त्यानंतर पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार व त्यांच्या सहकार्यांनी तपास सुरु केला होता. अखेरीस मनोचीवाडी येथील खणतळावर ट्रॅक्टर व दोन ट्रॉली आढळून आल्या. पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेऊन संशयितांचा शोध सुरु ठेवला आहे. सद्यस्थितीत ऊस गळीत हंगाम सुरु असल्याने ट्रॅक्टरमालक मारुती बन्ने यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी चोरीस गेलेला ट्रॅक्टर व ट्रॉली बन्ने यांच्याकडे सुपूर्द केला. पुढील तपास निरीक्षक तळवार करत आहेत.