Aamir Khan Love Life: अभिनेता आमिर खान पुन्हा चर्चेत आला आहे. आता अभिनेता त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या घटस्फोटानंतर आमिरच्या आयुष्यात पुन्हा नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. आमिर खानच्या आयुष्यात एक मिस्ट्री वुमन आहे, जिच्यासोबत अभिनेता रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांचं नातं फार गंभीर असल्याचं देखील सांगितलं जात आहे.
रिपोर्टनुसार, आमिर खान याची मिस्ट्री वुमन बेंगळुरू येथील आहे. त्यांच्या गोपनियतेचा आदर करत आम्ही अधिक माहिती शेअर करणार नाही… दरम्यान. आमिर खान याच्या आयुष्यातील नव्या महिलेने अभिनेत्याच्या कुटुंबियांची भेट घेतली असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
रोमाँटिक आहे आमिर खान…
नुकताच ‘लवयापा’ सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनात आमिर खान याला देखील स्पॉट करण्यात आलं. आमिर खान मुलगा जुनैद आणि खुशी कपूर यांच्यासोबत दिसला. यावेळी आमिरने स्वतःला रोमाँटिक असल्याचं सांगितलं. ‘आई शपथ… मी प्रचंड रोमाँटिक माणूस आहे. ऐकायला फार फनी वाटत असेल पण माझ्या दोन्ही पत्नींना विचारा. म्हणून मी रोमाँटिक सिनेमे करतो..’
‘रोमाँटिक सिनेमांमध्ये मी हरवतो… खऱ्या प्रेमावर माझा फार विश्वास आहे. आयुष्यात पुढे जात आहे, तसं प्रेमाबद्दल असलेली समज दृढ होत आहे…’ असं अभिनेता आमिर खान म्हणाला. सध्या आमिर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
घटस्फोटावर किरण राव हिचं वक्तव्य
आमिर खान सोबत घटस्फोट झाल्यानंतर किरण राव हिने अनेकदा मनातील भावना व्यक्त केला. परस्पर सहमतीने आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर आमच्यात वाद नाही. आम्ही चांगले मित्र आहोत… असं देखील किरण राव म्हणाली.
आमिर खानच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘लाल चड्ढा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता. सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा फेल ठरला. सिनेमात अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत होती.
अद्याप आमिर खान याने नव्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. पण निर्माता म्हणून आमिर खान याचा ‘लाहोर 1947’ प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत झळकणार आहे.