ठेंगोडा येथे आरंभ पालक मेळावा:विविध 55 खाद्यपदार्थांसह अंकुर व आकार प्रात्यक्षिक

1 day ago 1
बागलाण बालविकास प्रकल्पातील दोन बिटच्या वतीने ठेंगोडा येथे बिटस्तरीय आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात गरोदर माता, स्तनदा माता व एक ते तीन वर्षांच्या बालकांना द्यावयाच्या सकस आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बालकांना द्यावयाच्या पोषण आहाराची माहिती देण्यासाठी सर्वप्रकारचा भाजीपाला व विविध डाळींचे पदार्थ बनवून आहार प्रात्यक्षिक करण्यात आले होते. निरपूर बिटातील २६ अंगणवाडी केंद्रांच्या वतीने विविध ५५ खाद्यपदार्थांसह अंकुर व आकार बालशिक्षण प्रात्यक्षिक करण्यात आले. बालकांना द्यावयाचे विविध पोषक पदार्थ कसे बनवावेत, त्यापासून बालकांना काय पोषक तत्त्व मिळतात, याची माहिती पी. एच आहिरे, सेविका माधुरी पवार यांनी दिली. सरपंच भारती वाघ व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निरपूर बिटातील सर्व अंगणवाडीसेविका आदींची उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article