Published on
:
22 Jan 2025, 11:34 am
Updated on
:
22 Jan 2025, 11:34 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा २०२३ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'डंकी'मध्ये अभिनेता वरुण कुलकर्णी दिसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, वरुण कुलकर्णीला किडनीशी संबंधित आजार झाला आहे. त्याला आठवड्यात कमीत कमी दोन वेळा डायलिसिस करावं लागत आहे.
वरुण कुलकर्णीचा मित्र रोशन शेट्टीने इन्स्टाग्रामवर त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिलीय. रोशन शेट्टीने हेदेखील सांगितले की, उपचारासाठी त्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयाचे बिल देखील भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मित्राने वरुणसाठी मदतीचे केले आवाहन
रोशन शेट्टीने सर्व लोकांना या संकटांच्या समयी पुढे येऊन वरुण कुलकर्णीची मदत करण्य़ाची विनंती केली आहे. रोशन शेट्टीने इन्स्टाग्रामवर लिहिलीय- माझा प्रिय मित्र आणि थिएटर सह-कलाकार, वरुण कुलकर्णी, सध्या किडनीच्या गंभीर समस्यांशी लढा जेत आहे. पैसे जमा करण्याच्या मागील काही प्रयत्नांनंतरही त्याच्या उपचाराचा खर्च वाढत जात आहे. वरुण कुलकर्णीची नियमित देखभाल आणि आठवड्यातून २-३ वेळी डायलिसिसची गरज पडत आहे.
रोशन शेट्टीने म्हटलंय - वरुण न केवळ एक शानदार कलाकार आहे. एक दयाळू आणि निस्वार्थ व्यक्ती देखील आहे. त्याने खूप कमी वयात आपल्या आई-वडिलांना गमावलं होतं...एका कलाकाराचे जीवन नेहमी पैशांशी संबंधित आव्हानाने भरलेलं असतं आणि या कठीण क्षणात त्याला पूर्वीपेक्षा अधिक आपल्या समर्थनाची गरज आहे.
रोशन शेट्टीने पुढे लिहिलंय - मी आणि वरुणचे दुसरे अनेक मित्र आणि शुभचिंतक, या महत्वाच्या समयी वरुणची मदत करण्यासाठी पुढे यावे. जर तुम्ही वरुणला वैयक्तिकपणे ओळखता, तर तुम्ही तुमची मदत थेट पाठवू शकता. जे लोक ओळखत नाहीत, त्यांच्यासाठी पैसे पाठवण्यासाठी एक केटो लिंक तयार केली आहे.