‘त्या’ पीक विमा कंपनीचे लायसन्स रद्द करा:युवक काँग्रेसची कृषी विभागावर धडक; कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी

2 hours ago 1
अमरावती पिक विमा कंपनीचे सर्वेक्षण करणारे कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन शेतकऱ्यांची लूट करत आहे. अशा तक्रारी युवक काँग्रेसकडे प्राप्त होत आहे, असा दावा युवक काँग्रेसकडून केला आहे. त्यामुळे पीक विमा कंपनीचा परवाना रद्द करावा. अशी मागणी युवक काँग्रेसने कृषी अधीक्षकांकडे निवेदनातून केली. या संदर्भात युवक काँग्रेसने निवेदनात नमूद केल्यानुसार, काही दिवसापूर्वी पैशाची मागणी करणाऱ्या एका पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्यांनी चोप दिला. पीक विमा कंपनीला शासनाने पीक विमा सर्वेक्षणाचे कंत्राट दिले. त्या कंपनीकडून सर्वेक्षणासाठी लावलेल्या या युवकांना वेतन दिले नाही. या युवकांना गावोगावी फिरताना अपघात किंवा दुर्घटना झाली तर विमा किंवा अन्य सुविधा यांना पीक विमा कंपनीकडून देण्यात येत नसल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करून त्यांच्याकडून पैसे घेण्याची मुभा या कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिली काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. भविष्यात शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे काही गैरप्रकार घडला तर एखादा गरजू युवक हकनाक बळी पडल्यास याला पीक विमा कंपनी व कृषी विभाग जबाबदार असेल असा आरोप या वेळी युवक काँग्रेसने निवेदनात केला. दरम्यान कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीशी दूरध्वनीवरून संवाद साधला. तेव्हा त्यांनीही या युवकांना वेतना विषयी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या कंपन्या जिल्ह्यातील बेरोजगार युवकांचा फायदा घेत पिळवणूक करून घेत आहे. शेतकऱ्यांची लूट करण्यास प्रवृत्त करत आहेत, असा आरोपही युवक काँग्रेसने केला. या पीक विमा कंपनीला ब्लॅक लिस्ट करून लायसन्स रद्द करावे. असे निवेदन दिले. या वेळी सागर वानखडे, समीर जवंजाळ, वैभव देशमुख आदी उपस्थित होते. युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची कृषि अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article