राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र आता या निकालावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला जातो. आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला अनेक सवाल विचारले. आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नाही. आम्ही आरोप केले पाहिजे. पण आरोप करत नाही. फक्त आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी निवडणूक आयोगाने द्यावी. नाव, पत्ता आणि फोटोग्राफसह द्यावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपानंतर संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली. जर या देशातील निवडणूक जिवंत असेल, तर जे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारण्यात आले, त्यांनी त्याचे उत्तर दिलं पाहिजे. पण आयोग उत्तर देणार नाही. कारण हा आयोग सरकारची गुलामी करत आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे वारंवार जाऊन डोकं आपटलं. पण निवडणूक आयोग मेला आहे. हे जे ३९ मते कुठून आले. आता हे ३९ लाख मते बिहारमध्ये जाणार. हे फ्लोटिंग वोट आहेत. तेच नाव, तेच आधारकार्ड राहिले. काही दिल्लीत आले आहेत. महाराष्ट्र पॅटर्न आणि आम्ही पाहिला. आता बिहारमध्ये जातील, नंतर यूपीत जाईल. हे लोक याच पॅटर्नने जिंकत आहे. देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल, विधानसभा आणि लोकसभा जिवंत ठेवायची असेल तर सवाल केले पाहिजे. महाराष्ट्रात ते कसे जिंकले आणि आम्हाला कशा पद्धतीने हरवले हे आम्ही दाखवलं आहे. निवडणूक आयोगावर जे कफन टाकलं आहे. त्याचा त्यांनी उत्तर द्यावं, असे संजय राऊत म्हणाले.
यानंतर सुप्रिया सुळे यांनी बॅलेटवर निवडणुका घ्या ईव्हीएम बंद करा अशी जोरदार मागणी केली. धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही. त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. पण मशीन बंद करा. राज ठाकरेंनीही त्यांच्या उमेदवाराला त्याचंही मत मिळालं नसल्याचं सांगितलं. आम्ही आणि शिवसेना तिथे लढलो. आमचा पक्ष फोडला. आमदार फोडले. आम्ही अजूनही लढत आहोत. आम्हाला तुतारी चिन्ह दिलं. या सरकारमधील एक मंत्री आहेत. त्याने सांगितलं की, साताऱ्यातील सीट एनसीपी पराभूत झाली कारण ट्रम्पेट आणि तुतारीमुळे झाले. आम्ही तुतारी हटवण्याची मागणी केली. सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचं आम्ही सांगितलं. तरीही त्यांनी चिन्ह बदललं नाही. याच कारणामुळे आमची साताऱ्याची सीट गेली. ११ जागा आमच्या अशा गेल्या, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी फेअर निवडणुका व्हाव्यात. आम्ही मतदार यादी मागत आहोत. त्या द्या. बाकी काय मागत आहोत, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला.
ऑनलाईन नाव वाढवू शकतात. मी रोज मॉनिटर करायचे. शेवटच्या तीन दिवसात आम्ही निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यावेळी ही नाव वाढली. लाडकी बहीण योजनेतही बोगस आधारकार्ड मिळाले आहेत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.