अधिकाऱ्याला कानाखाली मारल्याप्रकरणी नरेश मीणा याला गुरुवारी अटक करण्यात आली होती. (Image source- X)
Published on
:
15 Nov 2024, 12:26 pm
Updated on
:
15 Nov 2024, 12:26 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान महसूल अधिकार्यास कानशीलात लगावल्या प्रकरणी अपक्ष उमेदवार नरेश मीनाला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी (दि.14) त्याला अटक करून जयपूरला आणण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह 10 कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.