दहा वर्षांत विकासाचा डोंगर आ. सावरकरांनी उभा केला:कॉर्नर बैठकीत माणिकराव नालट यांचा दावा
2 hours ago
1
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच शेतकरी चळवळ, व्यापारी, सर्वसामान्यांच्या वेदना जाणणारा नेता व दहा वर्षांत विकासाचा डोंगर उभा करणारे अकोला पूर्वचे उमेदवार आ. रणधीर सावरकर यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन माणिकराव नालट यांनी केले. मोठी उमरी शिव मंदिर जवळ घेण्यात आलेल्या कॉर्नर बैठकीत ते बोलत होते. माणिकराव नालट म्हणाले की, रणधीर सावरकर हे संघाचे स्वयंसेवक तसेच राष्ट्रभक्त आहेत. व्यक्तीपेक्षा विचारांना मानणारा तसेच सामाजिक दायित्व लक्षात घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. सबका साथ सबका विकास संस्कृती संवर्धन ही परंपरा आ. रणधीर सावरकर यांनी जोपासली. गेल्या दहा वर्षात १८-१८ तास त्यांनी काम केले. आ. सावरकर म्हणाले की, उमरी ते मूर्तिजापूरला जोडणारा रस्ता सिमेंट काँक्रीट करून करण्यात येईल, त्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच पाण्याची समस्या, नागरिकांच्या घरकुलाचा प्रश्न निकाली लागणार असून सामाजिक विकासासाठी शहरात दवाखाने, क्रीडा संकुल, सांस्कृतिक भवन, पथदिवे उभारणीचे काम झाले आहे. दहा वर्षाचा आपण लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे. अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष जयंतराव मसने होते. माजी महापौर अर्चना मसने, पूर्व मंडळ अध्यक्ष संदीप गावंडे, डॉ. किशोर मालोकार, नगरसेवक मिलिंद राऊत, जगन्नाथ मुरूमकार, ओळंबे काका, प्रह्लाद मामा शेगोकार, विश्वनाथ कोरकाने, भडांगे काका, संदीप शेगोकार, सुभाष वारोकर, गजानन बेलसरे, राजू मंजुळकर, दांडगे काका, शिवलाल इंगळे, नरेंद्र दिंडोकार, संजय शेगोकार, आशिष मसने, हरिदास लोखंडे, विठ्ठल देशमुख, अनुराधा नावकार, पल्लवी मोरे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)