पैठणमध्ये 22 पैकी 5 केमिकल कंपन्यांतील पावडरचे घेतले नमुने, ड्रग्जच्या अनुषंगाने एमआयडीसीमध्ये शनिवारपासून पथकाची मोहीम‎

2 hours ago 1
पैठण एमआयडीसीमध्ये २०२३ मध्ये ड्रग तयार करत असल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुन्हा आता छत्रपती संभाजीनगर येथील औषधे व अन्न प्रशासन विभाग आणि दहशतवादविरोधी पथक यांच्या पथकामार्फत एमआयडीसी पैठण हद्दीतील २२ केमिकल कंपन्यांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान कंपन्यांमधील पावडर, रासायनिक द्रव्य, केमिकल आदीची तपासणी करुन लॅबमध्ये पाठवण्यात येत आहे. गतवर्षी गुजराती उद्योजक दाम्पत्याच्या कंपनी व घरातून २५० कोटींचे ड्रग्ज जप्त करणाऱ्या पथकाने पैठण औद्योगिक वसाहतीतील ६ कंपन्यांवर छापा मारला होता. यावेळी दोन कंपन्यांमधून १६० कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. आता पुन्हा खबरदारी म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांनी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (निजाम बंगला, छावणी परिसर) यांना व औषधे व अन्न प्रशासन विभाग आणि दहशतवादविरोधी पथक यांना पत्रव्यवहार करून कंपन्यांची तपासणी करण्याची मागणी केली होती. शनिवारपासून कंपन्यांची तपासणी सुरू झाली आहे. ही मोहीम सर्व कंपन्यांची तपासणी सुरू होईपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली. Q.कंपन्यांची आत्ताच तपासणी करण्याचे कारण काय? A . एक वर्षानंतर तपासणी करत आहोत. ड्रग्ज आढळून आल्यानंतर एकाही कंपनीची तपासणी करण्यात आली नव्हती. सध्या कंपन्यांत नेमके काय सुरू आहे याचीदेखील तपासणी करीत आहोत. Q. नेमकी कशाची तपासणी करतात? A . कंपन्यांमधील पावडर, रासायनिक द्रव्य, केमिकल आदींची तपासणी करून ते लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे. Q. दोषी आढळल्यास कारवाई काय करणार? A . उत्तर तपासणीदरम्यान काही आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. यासाठी टीम प्रत्येक कंपनीत जाऊन बारकाईने तपासणी करीत आहे. Q. किती दिवस मोहीम असेल? A. सर्व कंपन्यांची तपासणी होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. {ईश्वर जगदाळे , सहायक पोलिस निरीक्षक कोणी एमआयडीसीमध्ये अमली पदार्थ ड्रग्ज किंवा ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तयार करत असेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी दिली. गतवर्षी दोन कंपन्यांमध्ये ड्रग्ज आढळून आले होते. यावेळी दोन्ही कंपन्यांना सील करण्यात आले होते. या कंपन्यांना अजूनही सील कायम आहे. गतवर्षी येथे झालेल्या कारवाईमुळे येथे नव्याने एकही केमिकलची कंपनी उभी राहिलेली नाही. दिव्य मराठी थेट सवाल

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article