शेतकऱ्यांसह मजूर म्हणतात, आम्हाला काय फायदा?:विधानसभा निवडणुकीत कोण जिंकेल, कोण हरेल... पण आमचे दिवस सारखेच
2 hours ago
1
सध्या राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे थंडीत राजकीय वातावरण गरम झाले आहे. लोकप्रतिनिधींकडून मतदारराजावर आश्वासनांची खैरात केली जात आहे. पण, सरकार कुणाचेही येवो, आमचे दिवस सारखेच आहेत, अशी भावना शेतमजुरांमधून व्यक्त केली जात आहे. लोकशाहीत मतदानाला फार महत्त्व आहे. १८ वर्षांवरील सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक असून मतदानाचा दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी देण्यात आली. तसेच उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या प्रत्येक उपक्रम व आस्थापनेला पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास मतदानासाठी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी दोन तासांची सवलत मिळणार असून कर्मचाऱ्यांना मतदानासाठी मीड वीक ऑफ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार न कापता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. पण, देशाचा पोशिंदा असलेले शेतकरी, शेतमजूर, रोजंदारीवर काम करणारे मजूर, अकुशल कामगार, कारागीर, कंत्राटी मानधनावर काम करणारे असंघटित रोजंदार, हातावर पोट असलेले कष्टकरी यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कामावर न जाता मतदानासाठी एक दिवसाची पूर्ण रोजंदारीची मजुरी मिळेल का, एक दिवस कामावर न गेल्यास संध्याकाळची चूल पेटेल का, असा सवाल मजुरांमधून व्यक्त केला जात आहे. बांधकाम कामगार मनोज साळवे म्हणाले, आम्हाला आताही ४०० ते ५०० रुपये आणि निवडणुकीनंतरही सध्याचीच रोजंदारी मिळेल. यामुळे कोण जिंकेल आणि कोण हरेल याचा आम्हाला काही फरक पडत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शेतकरी व कामांवर असणाऱ्या मजुरांनाही मतदानाच्या दिवशी पगार द्यावा. ^ कष्टकरी व गरजूंच्या समस्यांवर विचार करणारे सरकार हवे आहे. निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी यांचा विचार होतो. मात्र, सरकारला निवडून देणाऱ्या सामान्य जनतेचा विचार कधीच होत नाही. -लक्ष्मण घाईट, शेतकरी समस्यांवर विचार व्हावा
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)