दिव्य मराठी हॉट सीट रामटेक:काँग्रेसच्या मुळकांचे बंड उद्धवसेनेच्याच मुळावर
2 hours ago
1
रामटेकमध्ये शिंदेसेनेचे आशिष जयस्वाल, मविआ उद्धवसेनेचे विशाल बरबटे आणि काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांच्यात तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांनी मुळकांचा जाहीरपणे प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे मुळकांचे बंड उद्धवसेनेच्याच मुळावर आल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी बंडखोरी केली. म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले. दुसरीकडे मुळक यांनी माघार घ्यावी, असे प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केले. पण त्याला सुनील केदार किंवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या लढतीत चंद्रपाल चौकसे व सचिन किरपान या दोन अपक्षांवरही विजयी उमेदवार ठरणार आहे.
महायुतीने लोकसभा निवडणुकीत खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून काँग्रेसमधून ऐनवेळी शिंदेसेनेत आलेले आमदार राजू पारवे यांना तिकीट दिले होते. मात्र, त्यांचा काँग्रेसचे उमेदवार श्याम बर्वे यांनी पराभव केला. त्यामुळे विधानसभेला रामटेकची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केली होती. त्यांना निलंबित करण्यात आले, तर पारवेंना माघार घेण्यास भाग पाडण्यात आले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)