दुहेरी चालीने राज समर्थक संभ्रमित:मनसेला मोठा मुद्दा उभा करावा लागेल
2 hours ago
1
मराठी मतांचे राजकारण या मुद्द्यावर २००४ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाला अजूनही मोठी भरारी घेता आलेली नाही. लाडक्या बहिणीला नाकारले महायुतीची लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरत असतानाच मनसेने आपल्या जाहीरनाम्यात अशा योजनेला कोणतेही स्थान दिले नाही. पुनश्च हरिओम : राजकारणात टिकण्यासाठी मनसेला आता राज्यातील मोठा मुद्दा उभा करून आक्रमक लढा उभारावा लागणार आहे.
दुहेरी चाल : एकीकडे राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली असतानाच दुसरीकडे भाजपच्या काही उमेदवारांना पाठिंबा दिला. पुढे काय ?
यापुढील मनसेची वाटचाल अत्यंत कठीण असणार आहे. विधान परिषदेवर अमितसह बाळा नांदगावकरांची वर्णी लावण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करतील. तसेच मुंबई महापालिकेत पूर्ण ताकदीने लढण्यासाठी पावले टाकतील. तेव्हा १०० जागांवर अपयश
२०१९च्या विधानसभेत मनसेने १०१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी एका जागेवर मनसेला विजय मिळाला होता. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे विजयी झाले होते. त्या वेळी १०० जागांवर मनसेला अपयश आलं होतं. एक होता, तोही गेला
राज ठाकरे यांच्या मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राज यांचे पुत्र अमित यांच्यासह पक्षाचा एकमेव आमदार राजू पाटील यांचाही पराभव झाला आहे. हे दोन्ही पराभव राज ठाकरेंना मोठा धक्का देणारे आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)