देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अडले घोडे?:विनोद तावडेंनी शहांपुढे उपस्थित केला मराठा समाजाच्या नाराजीचा मुद्दा; BJP नवा चेहरा देणार?

2 hours ago 2
महाराष्ट्राचा नवा कारभारी कोण? या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. पण भाजप फडणवीस यांच्या नावावर अत्यंत सावधपणे पुढे जात आहे. हा भगवा पक्ष सध्या महाराष्ट्रातील सर्वच जातीपातींचे समीकरण साधण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर पेच फसल्याचा दावा केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी रात्री उशिरा भाजप नेत विनोद तावडे यांच्याशी विस्तृत चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास 40 मिनिटांपर्यंत चाललेल्या या बैठकीत विनोद तावडे यांनी शहा यांना महाराष्ट्रातील मराठा आंदोलनासंबंधी जो फिडबॅक दिला, तो फडणवीस यांच्या बाजूने नाही. यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचे नाव घोषित करण्यास विलंब होत आहे. सूत्रांच्या मते, महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे फिक्स आहे. पण तो कोण होणार? हा कळीचा मुद्दा आहे. विनोद तावडे व अमित शहा यांच्या बैठकीनंतर भाजप नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या जागी अन्य एखाद्या नावावर विचार करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठा समाजाच्या नाराजीकडे अंगुलीनिर्देश यासंबंधीच्या वृत्तानुसार, विनोद तावडे यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्याच्या स्थितीत मराठा समाज नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री दिला तर मराठा समाज नाराज होण्याची दाट शक्यता आहे. त्यामु्ळे भाजप नवे समीकरण साधण्याचा प्रयत्न करत आहे. विनोद तावडे स्वतः महाराष्ट्रातील बडे नेते आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष तळागाळापर्यंत काम केले आहे. विशेषतः ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व बिहारचे प्रभारीही आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाला त्यांच्या फिडबॅककडे दुर्लक्ष करणे अवघड झाले आहे. देवेंद्र फडणवीस आज स्वतः दिल्लीत दुसरीकडे, भाजपच्या वर्तुळात महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला येत आहेत. ते आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या 4 नेत्यांच्या बैठकीत महाराष्ट्रातील संभाव्य मंत्रिमंडळावर चर्चा होईल. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नावही निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. तूर्त, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस पहिल्या क्रमांकावर आहेत. 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजप प्रणित महायुतीला सर्वाधिक 235 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 132 जागा आल्या आहेत. हे ही वाचा... महाराष्ट्राचा नवा कारभारी आज ठरणार? मुंबई/नवी दिल्ली - आज महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा होऊ शकते. त्यासाठी दिल्लीत महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तूर्त पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे मानले जात आहे. मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला पोहोचलेत. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article