देशातील सर्व अभ्यासक्रमात पाली भाषा अनिवार्य करा- परिषदेत ठराव:फर्दापुरात 18 वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात
2 hours ago
1
फर्दापूर देशात सर्व स्तरांवरील अभ्यासक्रमात पाली भाषेचे शिक्षण अनिवार्य करण्यात यावे.बुद्धलेण्या, गुंफा, शिलालेख, स्तूप ही आपली राष्ट्रीय स्मारके आहेत. यास पुरातत्त्व खात्याच्या नियमाप्रमाणे नीट संरक्षण देण्यात यावे. हिंदू विवाह व वारसा हक्क तसेच मुस्लिम पर्सनल लॉ याप्रमाणे बौद्धांसाठी स्वतंत्र बौद्ध विवाह वारसा हक्क कायदा निर्माण करण्यात यावा. धम्माचल फर्दापूर, ता. सोयगाव या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा आदींसह १९ ठराव धम्म परिषदेत घेण्यात आले. शुक्रवारी अजिंठा लेणीच्या सान्निध्यात वसलेल्या फर्दापूर येथील "धम्माचल’ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात दक्षिण कोरियातील गँगवॉन प्रांताचे माजी राज्यपाल किम जीन सून म्हणाले, बुद्ध आणि संघाच्या तत्त्वाच्या पालनाने केल्यानेच दक्षिण कोरियाचा विकास शक्य झाला आहे. बुद्धाच्या तत्त्वाचे पालन केल्यास सर्वांनाच उद्दिष्ट साधणे सहज शक्य आहे. त्यामुळे बुद्धाच्या या पवित्र भूमीत होत असलेल्या १९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत मला उपस्थित राहता आले हे मी माझे सौभाग्य समजतो, असे प्रतिपादन दक्षिण कोरियातील गँगवॉन प्रांताचे माजी राज्यपाल किम जीन सून यांनी केले. शुक्रवारी अजिंठा लेणीच्या सान्निध्यात वसलेल्या फर्दापूर येथील "धम्माचल’ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, परिषदेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी दहा वाजता दक्षिण कोरिया येथील बौद्ध विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.ली ची रैन यांच्या हस्ते धम्माचल येथे धम्म ध्वजारोहण करण्यात येऊन येथील बुद्धमूर्तीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)