दोडामार्ग-कुंभवडे जंगलात दुर्मीळ ब्लॅक पँथरचे दर्शन.Pudhari File Photo
Published on
:
27 Nov 2024, 12:21 am
Updated on
:
27 Nov 2024, 12:21 am
दोडामार्ग : सह्याद्रीच्या दर्या-खोर्यात घनदाट जंगलामध्ये वसलेल्या दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे गावात दुर्मीळ ब्लॅक पँथरचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. आठ महिन्यांपूर्वी तेरवण-मेढे परिसरातही ब्लॅक पँथर पाहावयास मिळाला होता. त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगात ब्लॅक पँथरचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे.
कळणे येथील दर्शन देसाई हे काही कामानिमित्त कुंभवडे ते चंदगड असा प्रवास करत असताना त्यांना कुंभवडेमधील जंगल भागात हा दुर्मीळ ब्लॅक पँथर पाहावयास मिळाला. वाहन आल्याचे पाहताच ब्लॅक पँथर झुडपांमध्ये लपू लागला. यावेळी दर्शन देसाई यांनी त्या ब्लॅक पँथरची छबी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. मार्च महिन्यातही तेरवण मेढे येथील जंगलात ‘वाईल्ड वन’ या नावाने प्राणी व पक्षी अभ्यासकांसाठी उभारलेल्या इमारतीच्या परिसरात ब्लॅक पँथर द़ृष्टीस पडल्याची घटना घडली होती. सह्याद्रीच्या पर्वतरांगांत पुन्हा एकदा ब्लॅक पँथरचे दर्शन झाल्याने येथील जैवविविधता अधोरेखित होते. वन विभागानेदेखील या परिसरात ब्लॅक पँथर असल्याचे सांगितले.