उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात गोरखपूर जिल्ह्यातील दोन महिलांनी समलैंगिक विवाह केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवरियाच्या नाथबाबा मंदिरात महिलांचं लग्न झालं. आता संपूर्ण जिल्ह्यात याच ग्नाची चर्चा होत आहे. त्यावरून लोकं विविध प्रतिक्रिया देत आहेत. पतीच्या छळाला त्या दोघी एवढ्या कंटाळल्या होत्या की त्यांन घरात राहणं आवडतच नव्हतं.दोन्ही महिलांचे त्यांच्या पतीशी रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण व्हायचं. त्यामुळे त्या अक्षरश: वैतागल्या होत्या. याच दरम्यान, इन्स्टाग्रामवर यांची एकमेकींशी मैत्री झाली. त्या अनेक वर्षे एकमेकांच्या संपर्कात होत्या आणि त्याच काळात दोघीही एकमेकींच्या प्रेमात पडल्या.
अखेर पतीशी रोजच्या होणाऱ्या भांडणामुळे त्या एवढ्या कंटाळल्या की त्यांनी आपापल्या पतीचं घर सोडलं आणि अखेर टोकाचं पाऊल उचललं. त्या घरातून पळाल्या आणि शिव मंदिरात जाऊन त्यांनी एकमेकींशी लग्न केलं.
घरातून पळून जाऊन केलं लग्न
या दोन्ही विवाहित महिलांनी गोरखपूर जिल्ह्यातून देवरिया येथील मंदिरात पळून जाऊन मंदिरात लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार , त्या दोघींचं एकमेकींवर अनेक वर्षांपासून प्रेम होते. त्यांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथही घेतली. आम्ही एकमेकींशिवाय जगून शकत नाही असं म्हणत त्यांनी कायम एकत्र राहण्याचे वचन दिलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर जिल्ह्यातील बांसगाव भागात ही घटना घडली असून दोन्ही महिला याच परिसरातील रहिवासी आहेत.
सुनावली आपबीती
दोन्ही महिलांच्या सांगण्यानुसार, त्यांचे पती दारू प्यायचे आणि महिलांना मारहाणही करायचे. नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्या खूप वैतागल्या होत्या केल्यास त्याचे पती त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी द्यायचे. त्यांच्या कॉलनीच्या लोकांसमोरही पती त्यांचा अपमान करायचे. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळूनच त्या महिलांनी एकमेकींशी लग्न केलं. मंदिरात जाऊन त्यांनी सप्तपदी घेत विवाह केला. त्यांच्या या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.