शिर्डी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून, त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर यांनी केले आहे. अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्या वतीने पाठिंब्याचे पत्र मंत्री विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आश्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेमध्ये परिषदेच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकात म्हटले आहे की, मंत्री विखे पाटील यांनी समाजातील सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांच्या न्याय हक्कांसाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून धनगर समाजातील तरुणांकरिता महामेश योजना, अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सुरू केली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)