भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय जनता पक्षाने सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठली आहे. पैसे वाटून जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केला. वंचितचे उमेदवार घामाच्या कष्टाच्या पैशाने निवडणूक लढत आहे, तर आमच्या उमेदवारांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत, असेही सिद्धार्थ मोकळे म्हणाले. हा तर जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न
सिद्धार्थ मोकळे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठल्याचे या ठिकाणी दिसतंय. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणे अशक्य केले जात आहे आणि पैसे वाटून जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेला विनोद तावडे सारखा नेता पैशांसोबत हॉटेलमध्ये पकडल्या जातो ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आमच्या उमेदवारांवर प्राणघातक हल्ले केले जातात एकीकडे धनदांडगे आणि जात दांडग्या पक्षांकडून पैशाचा पाऊस पाडून निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न होतोय. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घामाच्या कष्टाच्या पैशाने निवडणूक लढत आहेत. तर आमच्या उमेदवारांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. प्रत्येक पद्धतीने आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही सिद्धार्थ मोकळे यांनी केला. यांना जनता योग्य धडा शिकवेल
राज्यात धनदांडगे आणि जात दांडग्यांनी लोकशाहीची थट्टा मांडली आहे. आम्ही या धनदांडग्या पक्षांचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आमच्या उमेदवारांवर हल्ले होत असताना हातावर हात ठेऊन बसलेल्या पोलिस प्रशासनाचाही निषेध करतो. जनता या पैसे वाटणाऱ्यांना, जनतेला विकत घेऊ पाहणाऱ्यांना 20 तारखेला योग्य धडा शिकवेल, असे सिद्धार्थ मोकळे म्हणाले. नेमके प्रकरण काय? भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना रंगे हात पकडले गेले आहे. बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी तावडे यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मते, विनोद तावडे यांनी स्वतः त्या ठिकाणी मतदारांना पैसे दिले. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या बुधवारी एका टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नालासोपारा मतदारसंघात ही घटना घडली. हे ही वाचा... विनोद तावडे प्रकरण भाजपचा नोट जिहाद:उद्धव ठाकरे यांचा घणाघात; म्हणाले - हे भाजप अन् महायुतीमधील गँगवॉर, उद्या महाराष्ट्र कारवाई करेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनोद तावडे प्रकरण हे भाजपचा नोट जिहाद असल्याची तिखट टीका केली आहे. महायुतीचे लोक राज्यात अत्यंत निर्घृणपणे राजकारण करत आहेत. ते जिंकण्यासाठी वाट्टेल त्या थराला जात आहेत. या प्रकरणी सर्व पुरावे असतानाही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रच उद्या काय ती कारवाई करेल, असे ते म्हणालेत. हे प्रकरण भाजप किंवा महायुतीमध्ये सुरू असणाऱ्या गँगवॉरचे उदाहरण असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पूर्ण बातमी वाचा... विनोद तावडेंकडून अशी अपेक्षा नव्हती:अत्यंत दुर्दैवी घटना.. स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न, मविआच्या नेत्यांकडून टीका विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे 5 कोटी रुपये वाटत असताना सापडल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील विनोद तावडे आणि भाजप महायुतीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पूर्ण बातमी वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)