धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मनपा प्रशासन सज्ज:दीक्षाभूमीवरील मदत कक्षाचे लोकार्पण, चार ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र

2 hours ago 1
68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुविधेसाठी महानगरपालिका तर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी मनपाच्या सोयी सुविधांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या संख्या लक्षात घेता 11 ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या मार्गांवर चार ठिकाणी मनपाचे आरोग्य तपासणी केंद्र, 24 तास रुग्णवाहिका, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मदतीसाठी साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ नियंत्रण कक्ष, अग्निशमन पथक, शौचालयांची व्यवस्था, निवारा व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, परिवहन व्यवस्था, अग्निशमन पथक आदी सर्व सुविधा मनपाद्वारे दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी करण्यात आलेल्या आहे. मनपाचे रक्तदान केंद्र दीक्षाभूमीवर येणाऱ्या सर्व बौद्ध अनुयायांना सुविधा प्रदान करण्यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे. मनपाच्या आरोग्य विभागातर्फे दीक्षाभूमी परिसरात रक्तदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. एखादी आकस्मिक घटना घडल्यास आपदाग्रस्तांना तातडीने औषधोपचार मिळावा, यासाठी डॉक्टरसह परिचारिका कर्मचारी ॲम्बुलन्स उपयुक्त साधंनासह सतत 24 तास उपचार केंद्र सुरु राहणार आहे. याशिवाय रहाटे कॉलोनी चौक, नीरी रोड, काचीपूरा चौक, बजाज नगर चौक ते लक्ष्मीनगर चौक येथे औषधोपचार व तात्पुरते दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article