होप रुग्णालयात नवजात शिशूंपासून ते १६वर्षीय मुलांपर्यंत उपचार केले जातात. सोमवारीरात्री साडेआठ वाजताच्या सुमारासरुग्णालयाच्या ओटीमध्ये एका नवजातबाळावर अंत्यत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरूहोती. या बालकाच्या शरीरातील अन्ननलीकाआणि श्वसननलिका गुंतलेली होती, तीवेगवेगळी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया सुरूहोती. शस्त्रक्रिया सुरूच असताना अचानकपणेओटीतील एसीमधून मोठ्या प्रमाणात धूरनिघायला लागला. एसीमध्ये शॉर्टसर्कीटमुळेहा प्रकार घडत असून यामुळे आग लागण्याचीशक्यता लक्षात घेता रुग्णालयातील यंत्रणेनेअग्नीशमन यंत्राव्दारे एसीवर मारा केला.त्यामुळे आग लागली नाही किंवा एसीमधीलशॉर्ट सर्कीटमुळे निघणारा धूर कमी झाला. याप्रकाराने रुग्णालयातील उपस्थित सर्वांमध्येभितीचे वातावरण पसरले होते. यावेळीशस्त्रक्रिया सुरू असलेल्या बाळाला तत्काळअन्य एका खासगी रुग्णालयात नेवून त्याठिकाणी अर्धवट राहीलेली शस्त्रक्रिया पुर्णकरण्यात आली तसेच रुग्णालयात उपचार घेतअसलेले पाच नवजात शिशू व एक बालकअशा सहा रुग्णांना तातडीने अन्य खासगीरुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही माहीतीअग्नीशमन दलालासुदा देण्यात आली होती.अग्नीशमन दलाचे पथक पोहचण्यापुर्वीचआगीवर नियंत्रण आले होते. सहा रुग्णांना इतरत्र हलवले रुग्णालयातील यंत्रणेने तत्काळ अग्नीशमनयंत्राव्दारे एसीमधून निघणारा धूर नियंत्रणातआणला. त्यामुळे आग लागली नाही. यावेळी‘ओटी’मध्ये एका नवजात शिशूचे क्रिटीकलऑपरेशन सुरू होते. त्यामुळे दुसऱ्यारुग्णालयात नेऊन बाळाचे ऑपरेशन पूर्णकरण्यात आले. तसेच सुरक्षेच्या कारणामुळेसहा बालरुग्णांना अन्य खासगी रुग्णालयातदाखल केले आहे. डॉ. अद्वैत पानट, होप हॉस्पिटल. होप रुग्णालयात एसीमधील शॉर्ट सर्कीटमुळे घडली घटना शहरातील राजापेठ परिसरात असलेल्या होप चिल्ड्रेन रुग्णालयात सोमवारी (दि. ३) रात्रीसाडे आठ वाजता ऑपरेशन थेअटरमधील एसीमधून अचानक धूर निघाला. विशेष म्हणजे त्यावेळी त्याच ‘ओटी’मध्ये एका नवजातबाळावर अंत्यत किचकट शस्त्रक्रिया सुरूहोती. एसीमधून निघणारा धूर रुग्णालयातील यंत्रणेनेच तत्काळ आटोक्यात आणला आणिमोठी हानी टाळली. मात्र सुरक्षेच्या कारणावरुनया रुग्णालयात उपचारासाठी दाखल सहा बालरुग्णांना इतर खासगी रुग्णालयातहलिवण्यात आले होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)