नवी मुंबईत मतदान केंद्राबाहेर EVM हॅकिंगसाठी राऊटर?:दुसरीकडे धुळ्यात 10 हजार चांदीच्या विटा सापडल्या

1 day ago 2
नवी मुंबईत मतदान केंद्राबाहेर एका वाहनात राउटरसारखे दिसणारे इलेक्ट्रॉनिक सामान आढळून आहे. नेरूळमधील शिवाजी नगर तुर्भे येथे एका मतदान केंद्राजवळ हे राउटर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. ईव्हीएम मशीन हॅकींगसाठी हे राउटर आणल्याची राजकीय पक्षांना शंका होती. याबाबत तुर्भे पोलिसांनी तपास करून सत्य समारे आणले आहे. सदरील सामान हे मोबाईल कंपन्याचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यात एका कंटेनरमध्ये 94 कोटी 68 लाख रुपयांच्या 10 हजार चांदीच्या विटा आढळल्या आहेत. राज्यात 288 विधानसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या दरम्यान नेरूळच्या शिवाजीनगर मतदान केंद्रावर एका गाडीत काही इंटरनेटचे पाच राऊटर आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक सामान संशयास्पदरित्या आढळले. या सामानाकडे पाहून ते हॅकिंगचे असल्याचे दिसत आहे. माहिती मिळताच तुर्भे पोलिसांनी सदरील वाहन ताब्यात घेतले. त्यानंतर हे इलेक्ट्रॉनिक सामान कोणी आणि कशासाठी आणले होते, याचा तपास केला. मतदान केंद्राबाहेरच हे वाहन उभे असल्याने संबधित सामान ईव्हीएम मशीन हॅकींगसाठी आणले आहे का अशी राजकीय पक्षांना शंका होती, मात्र सापडलेले सामान हे शिवाजी नगर मधील मोबाईल टॅावर योग्यरित्या सुरू आहेत का हे चेक करणारी सिस्टम असल्याची माहिती तुर्भे पोलिसांकडून देण्यात आली आहे. धुळ्यात कंटेनरमध्ये आढळल्या 10 हजार चांदीच्या विटा दुसरीकडे, धुळ्यात एका कंटेनरमध्ये 10 हजार चांदीच्या विटा सापडल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात थाळनेर पोलिसांनी या कंटेनरची तपासणी केली असता त्यात चांदीच्या विटा आढळून आल्या. या 10 हजार चांदीच्या विटांची किंमत 94 कोटी 68 लाख रुपये आहे. सदरच्या चांदीच्या विटा या एचडीएफसी बँकेच्या असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या विटांची चौकशी सुरू आहे. हे ही वाचा... महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या मतदान:भाजप 149 जागी, काँग्रेसची 101 जागांवर लढत; 6 मोठ्या पक्षांसह 158 पक्ष रिंगणात महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकूण 158 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 6 मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article