नांदेड : प्रयागराजसाठी आजपासून विशेष रेल्वेचे नियोजन
प्रयागराजसाठी आजपासून विशेष रेल्वेचे नियोजनfile photo
Published on
:
22 Jan 2025, 11:35 am
Updated on
:
22 Jan 2025, 11:35 am
नांदेड, उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद, काचीगुड पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद या विशेष रेल्वे प्रयागराज छिवकी मार्गे चालविण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने घेण्यात आला आहे.
त्यानुसार गाडी क्र. ०७७२१ नांदेड ते पटणा बुधवारी (दि.२२) रात्री ११ वाजता सुटेल. गाडी क्र. ०७७२२ पटणा ते नांदेड २४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता सुटून २६ जा नेवारीला नांदेडला पोहचेल. तसेच गाडी क्र. ०७७२५ काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही रेल्वे २५ जानेवारी रोजी दुपारी पावणेपाच वाजता सुटणार असून, ०७७२६ पटणा ते काचीगुडा ही रेल्वे सकाळी साडेअकरा वाजता सुटेल. ०७०९९ नांदेड ते पटणा ही विशेष गाडी १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता सुटेल. तसेच ०७१०० पटणा ते नांदेड ही रेल्वे पटणा येथून १५ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता सुटणार आहे.
याशिवाय गाडी क्र. ०७१०१ औरंगाबाद-पटणा ही विशेष रेल्वे औरंगाबाद येथून १९, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता सुटून जालना, सेलू, परभणी, पूर्णा, अकोला मार्गे पटणा येथे जाईल. तर ०७१०२ पटणा ते औरंगाबाद रेल्वे २१, २७ आणि २९ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेआठ वाजता सुटेल.
या विशेष नांदेड, काचिगुडासह औरंगाबादहून सुटणाऱ्या वरील विशेष रेल्वे पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर मार्गे पटणा येथे पोहचणार आहे.