महामार्गावर 40 हजार वृक्षांची लागवड करणार file
Published on
:
04 Feb 2025, 6:43 am
Updated on
:
04 Feb 2025, 6:43 am
संगमनेर शहर : नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना तोडलेली झाडे, वन्यजीव यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, ओव्हर पास, पावसाचे पडणार्या पाण्यासाठी रेन वॉटर हा्वेस्टिंग ही कामे मार्च 2025 पर्यंत पूर्ण करा, 4 महिन्यात ती कामे पूर्ण झाली का, याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले आहेत.
2014 साली उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांनी पुणे - नाशिक रस्त्याच्या चौपदरीकरणात अडथळा ठरणारी 2373 झाडे तोडली. त्या झाडांच्या बदल्यात 10 पट झाडे लावण्याची अट घालत परवानगी दिली होती.त्या परवानगी नुसार 2020 पर्यंत कोणतीही कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून झाली नाही. या बाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांनी जुलै 2020 मध्ये पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण मध्ये याचिका दाखल केली होती.
या याचिकेत पहिल्यांदा संगमनेर तालुक्यात तोडलेल्या झाडांच्या बदल्यात 10 पट झाडे लावली नाही म्हणून कामकाज सुरू झाले होते. नंतर या रस्त्याशी संबधित पर्यावरण मंजुरीतले मुद्दे घेऊन हा रस्ता ज्या ज्या जिल्ह्यातून जातो त्या पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील तोडलेली झाडे,वन्यजीव यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग,ओव्हर पास,पावसाचे पडणार्या पाण्यासाठी रेन वॉटर हा्वेस्टिंग या मुद्द्यांवर सुनावणी झाली. त्यात ही कामे मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे व त्यानंतर 4 महिन्यात ती कामे पूर्ण झाली की नाहीत याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले आहेत.
तसेच माळवाडी येथे भुयारी मार्ग, खंदरमाळवाडी व कर्हे घाट येथे उड्डाणपूल तर वेल्हाळे, चंदनापुरी (जावळे वस्ती), डोळासणे येथे असलेल्या भुयारी मार्गात योग्य ते साऊंड आणि लाईट बसविण्याचे सुचवले होते. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा निर्माण करण्याचेही आदेशात म्हटले आहे.सदर याचिकेत अॅड. ऋत्विक दत्ता, राहुल चौधरी, इतिशा यांनी काम पाहिले तर पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर यांनी मार्गदर्शन केले.