कार विकत घेणं हे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचं स्वप्न असतं, पण मध्यमवर्गीयांसाठी कार विकत घेणं ही खूप मोठी गोष्ट असते. कार विकत घेण्यासाठी अधिक पैशांची गरज असते, ही मध्यमवर्गासाठी मोठी गोष्ट आहे. कार खरेदी करण्यासाठी अनेकजण बँकेकडून कार लोन घेण्याचा विचार करतात.
तुम्हालाही कार खरेदी करायची असेल आणि पैशांसाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला कार लोनच्या EMI च्या गणिताबद्दल सांगणार आहोत.
SBI कडून कार लोन
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. तुम्ही SBI कडून कार लोन घेऊ शकता. SBI च्या कार लोनच्या व्याजदरांबद्दल बोलायचे झाले तर SBI मध्ये कार लोनचे व्याजदर 9.20 टक्क्यांपासून सुरू होतात.
हे सुद्धा वाचा
8 लाख रुपयांच्या कार लोनवर मासिक EMI किती?
बहुतांश मध्यमवर्गीय लोक 8 लाखांपर्यंतची कार खरेदी करतात. अशातच आज आम्ही तुम्हाला 8 लाखांपर्यंतच्या कार लोनच्या हिशोबाबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही SBI कडून पुढील 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेत असाल तर तुम्हाला दरमहा पूर्ण 16,684 रुपये EMI म्हणून भरावे लागतील.
एवढ्या पैशांसाठी फक्त व्याज
तुम्ही 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कर्ज घेत असाल तर 5 वर्षांनंतर तुम्ही पूर्ण 10,01,067 रुपये बँकेला द्याल. यामध्ये 2,01,067 रुपये फक्त तुमच्या व्याजासाठी समाविष्ट केले जातील.
कर्जासाठी अर्ज कसा करावा?
गाडीवर लोन घेण्यासाठी बँक किंवा फायनान्स कंपनीच्या वेबसाईटवर जा किंवा तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्येही जाऊ शकता, बँकेच्या वेबसाईटवर तुम्हाला लोन अॅप्लिकेशन फॉर्म मिळेल ज्यामध्ये तुम्हाला कार कंपनी, मॉडेल, मॅन्युफॅक्चरिंगचे वर्ष, लोन घेण्याचे कारण अशी माहिती भरावी लागेल, मग हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तो सबमिट करावा लागेल.
आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
कारवर कर्ज मिळवण्यासाठी अर्जासोबत बँक डिटेल्स आणि गेल्या 2-3 वर्षांच्या इन्कम टॅक्स रिटर्नची प्रत आणि बँक स्टेटमेंट आवश्यक आहे.
कारवर कर्ज कसे मिळवायचे?
कारवरील कर्जासाठी तुमची कागदपत्रे सादर केल्यानंतर बँक किंवा फायनान्स कंपनी व्हेरिफिकेशन आणि व्हॅल्युएशनची प्रक्रिया सुरू करते, ज्याद्वारे ते कारच्या सध्याच्या किंमतीची गणना करतात. कारवरील कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या गॅरंटरची गरज नाही.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)