Kuno National Park – गुड न्यूज! कुनो अभयारण्यात दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन, चिता वीराने दिला दोन बछड्यांना जन्म

2 hours ago 1

मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय अभयाराण्यात दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगम झाले आहे. चित्ता मादी वीराने दोन बछड्यांना जन्म दिला असून अभयाराण्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

मध्य प्रदेशच्या भूमीवर बिबट्यांची संख्या सतत वाढत आहे, ही माहिती सांगताना मला आनंद होत आहे. आज चित्ता मादी वीराने 2 लहान बछड्यांना जन्म दिला आहे. मध्य प्रदेशच्या भूमीवर या बछड्यांचे स्वागत आहे. बछड्यांच्या आगमनाबद्दल मी राज्यातील जनतेचे हार्दिक अभिनंदन करतो, असे डॉ. मोहन यादव यांनी ट्वीटमध्ये म्हटल आहे.

#WATCH | Madhya Pradesh | Female cheetah Veera has given birth to 2 cubs at Kuno

MP CM tweeted, “…Today, female cheetah Veera has given birth to 2 cubs, cheetah cubs are welcome on the land of Madhya Pradesh and I send my hearty congratulations to the people of the state on… pic.twitter.com/y5cAvAzbsR

— ANI (@ANI) February 4, 2025

17 सप्टेंबर 2022 रोजी कुनोमध्ये सुरु झालेला प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत नामिबियाहून 8 आणि साऊथ आफ्रिकेहून 12 असे 20 चित्ते आणले होते. यापैकी 8 चित्त्यांचा मृत्यू झाला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article