भारतीय रेल्वे अंतर्गत गट ड पदांच्या भरतीसाठी अधिसूचना २१ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले लोक RRB अर्जाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचे ऑनलाइन अर्ज भरू शकतात
तुम्ही सरकारी नोकरीची वाट पाहत आहात का? मग हा व्हिडीओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण भारतीय रेल्वेत मेगा भरती होणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये ग्रृप डी पदांसाठी तब्बल ३२ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. या मेगा भरतीसंदर्भात भारतीय रेल्वेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांना येत्या २२ फेब्रुवारीपर्यंत भारतीय रेल्वे अंतर्गत गट ड पदांच्या भरतीसाठी अर्ज भरता येणार आहे. विशेष म्हणजे NCVT द्वारे मिळालेले अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र पात्र ठरणार आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत गट ड पदांच्या भरतीसाठी अधिसूचना २१ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले लोक RRB अर्जाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचे ऑनलाइन अर्ज भरू शकतात, जे अर्ज https://rrbapply.gov.in/ येथे उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची वेळ २३ जानेवारी २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान उपलब्ध असणार आहे. तर इच्छुक उमेदवार आपला तपशील देऊन, कागदपत्रे जोडून आणि शुल्क भरून अर्ज करू शकणार आहेत.
Published on: Feb 04, 2025 04:46 PM