Mamta Kulkarni Education: 90 च्या दशकातील लोकप्रिय आणि बोल्ड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. 25 वर्षांनंतर भारतात परतल्यावर ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. दरम्यान, महाकुंभ 2025 मध्ये तिनं किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर ही उपाधी मिळवून सर्वांना चकीत केले. दरम्यान, ममता कुलकर्णीने दहावीनंतर शाळा का सोडली? याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. जाणून घ्या.
ममता कुलकर्णी सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. बॉलिवूडची टॉप अभिनेत्री असलेल्या ममता कुलकर्णीने आपलं शिक्षण मध्येच सोडलं होतं. यामागचं नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या.
हे सुद्धा वाचा
महाकुंभात किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर ही पदवी दिली. पण काही दिवसांनी अंतर्गत कलहामुळे त्यांच्याकडून हा सन्मान हिरावून घेण्यात आला. किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनी आचार्य महामंडलेश्वर, लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि ममता कुलकर्णी यांची आखाड्यातून हकालपट्टी केली. नव्वदच्या दशकातील बोल्ड अभिनेत्री ममता कुलकर्णी साधू होण्याच्या घोषणेने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण सिनेमात येण्यापूर्वी ती काय करायची हे तुम्हाला माहित आहे का?
ममता कुलकर्णी हिचा जन्म 20 एप्रिल 1972 रोजी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईत एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. तिचे वडील मुकुंद कुलकर्णी हे परिवहन आयुक्त होते. ममता कुलकर्णीचे मूळ नाव पद्मावती कुलकर्णी होते. पण बॉलीवूडमध्ये एन्ट्रीच्या वेळी तिने त्यात बदल केला. ममता कुलकर्णीचे शिक्षण जुहू येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये झाले. मात्र, दहावीनंतर शिक्षण सोडून तिने बॉलिवूड अभिनेत्री बनली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ममता कुलकर्णीची बहीणही सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये शिकली आहे. शाळेच्या संकेतस्थळावर schoolsuniverse.com मिळालेल्या माहितीनुसार, कुलकर्णी ज्या शाळेत शिकली त्या शाळेची वार्षिक फी 20 हजार रुपये आहे. मुंबईतील वांद्रे येथील सेंट जोसेफ हायस्कूल महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न आहे. भारतीय क्रिकेटपटू जेमिमा इव्हान रॉड्रिग्जनेही येथून शिक्षण घेतले.
आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाळा सोडली
ममता कुलकर्णीने लहानपणापासूनच स्टेज शो आदींमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. तिने मॉडेलिंग करावं अशी तिच्या आईची इच्छा होती. त्यामुळेच दहावीनंतर तिनं शिक्षण सोडलं. ममता कुलकर्णीने 1992 मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
नुकताच झालेल्या एक मुलाखतीत ममता कुलकर्णी हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ममता कुलकर्णी हिची चर्चा रंगली आहे.