ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी वर्षा बंगल्यासंदर्भात केलेल्या खळबळजनक नव्या दाव्यानंतर शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पलटवार केला आहे. “भाजपच्या गोटात चर्चा आहे की, कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्याबाहेरील लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत. असं स्टाफ आणि त्याचे लोक सांगतात” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. तर “देवेंद्र […]
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी वर्षा बंगल्यासंदर्भात केलेल्या खळबळजनक नव्या दाव्यानंतर शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पलटवार केला आहे. “भाजपच्या गोटात चर्चा आहे की, कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्याबाहेरील लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत. असं स्टाफ आणि त्याचे लोक सांगतात” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. तर “देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? मनात कसली भिती आहे? इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, वर्षा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे, तिथे मुख्यमंत्री का जात नाहीत? याचे उत्तर लिंबू सम्राटने द्यावे” असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी ही मागणी केली. यावर निलेश राणेंनी भाष्य करत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘उत्तर प्रदेशच्या कुंभमेळात जवळपास ४० करोड लोकं येऊन जातात. तिकडची त्यामुळे आर्थिक व्यवस्था वाढली. आपल्या राज्यातील आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल यासाठी राजकारणी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. त्यावर चर्चा झाली पाहिजे’, असं निलेश राणे म्हणाले. तर संजय राऊत जादूटोणा यावर बोलतो. काय म्हणजे हा माणूस जगाच्या नकाशावरच नसेल. इतका निगेटिव्ह आणि फालतू माणूस असल्याचे म्हणत निलेश राणेंनी सडकून टीका केली.
Published on: Feb 04, 2025 03:04 PM