दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांच्या ‘थंडेल’ चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढत आहे. हा चित्रपट शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर आणि गाण्यांचीही चर्चा होताना दिसतेय. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हैदराबादमध्ये ‘थांडेल’च्या प्रमोशनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या मागणीमुळे, नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांनी चित्रपटातील ‘नमो नमः शिवाय’ या हिट गाण्यावर डान्स केला. विशेष म्हणजे यावेळी साई पल्लवीसमोर चैतन्यने थेट हात जोडले.
साई पल्लवीसमोर चैतन्यने हात का जोडले?
चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांनी स्टेजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी त्यांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना खूप आवडली आहे. स्टेजवर दोघांनीही दोघांच्याही ‘नमो नमः शिवाय’ या हिट गाण्यावर डान्स केला. या डान्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
नागा चैतन्य स्वभावाने थोडा लाजाळू असला तरी, प्रेक्षकांची ही खास मागणी पूर्ण करण्यासाठी त्याने स्टेजवर आपली डान्सची कला दाखवली. मात्र दोघांमध्येही साई पल्लवीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. कारण तिच्या डान्स स्टेप्स एवढ्या छान आणि हटके होत्या की सर्वांनी तिचं कौतुक केलं.
एवढच नाही तर प्रेक्षकांप्रमाणेच नागा चैतन्य देखील तिच्या डान्स स्टेप्स पाहून चकित झाला आणि त्याने कौतुकाने थेट तिच्या समोर हात जोडले. दोघांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही या दोघांचे कौतुक केले आहे तसेच चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
‘थांडेल’ ची कथा काय?
‘थंडेल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. नागा चैतन्य आणि साई पल्लवी स्टारर ‘थंडेल’ हा एक अॅक्शन ड्रामा आहे जो एका मच्छीमाराची कहाणीवर आधारित आहे. त्याला आंतरराष्ट्रीय महासागरात पाकिस्तानी सैन्याने पकडले जाते आणि त्यामुळे त्याच्यावर ओढवणाऱ्या संकटाचे वर्णन करण्यात आले आहे.
‘थंडेल’ रोमँटिक थ्रिलर चित्रपट
या चित्रपटात नागा आणि साई मुख्य भूमिकेत आहेत, तर संदीप आर वेद खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘थंडेल’ हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहेत. तसेच त्यात देशभक्तीची भावना आणि अनेक भावनिक दृश्ये ही प्रेक्षकांनापाहायला मिळणार आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर, चाहते आधीच ब्लॉकबस्टर आणि 2025 मधील सर्वात मोठा चित्रपट म्हणत आहेत. अनेकांच्या प्रतिक्रियांमध्ये असेही म्हटले आहे की हा चित्रपट ‘पुष्पाचा बाप’ आहे.
नागा चैतन्य आणि साई पल्लवीची केमिस्ट्री
नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. याआधी, नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांनी ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटामध्ये एकत्र काम करून प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
नागा चैतन्यने साई पल्लवीचे खूप कौतुक केले
मुलाखतीदरम्यान, नागा चैतन्यनेही साई पल्लवीचे खूप कौतुक केले. तो म्हणाला, “हा एक अद्भुत अनुभव होता. पल्लवीसोबत काम करणे नेहमीच आनंददायी असते. ती पडद्यावर खूप ऊर्जा आणते. ती माझ्या अभिनयाला अनेक प्रकारे पूर्ण करते. अशा परिस्थितीत, तिच्या सोबत काम करणे नेहमीच अद्भुत होते.”