हत्याकांडाने कोट्यवधी साई भक्तांचं श्रद्धा स्थान असलेल्या शिर्डीत झालेल्या हत्याने एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झालेल्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. पहाटे कामावर जात असताना ही घटना घडली.
गेल्या दोन दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. तर एक गंभीर जखमी आहे. या हत्याकांडाने कोट्यवधी साई भक्तांचं श्रद्धा स्थान असलेल्या शिर्डीत झालेल्या हत्याने एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झालेल्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. पहाटे कामावर जात असताना ही घटना घडली. दरम्यान, शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थानकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. आजपासून कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेळेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पहाटे चार वाजेऐवजी आता सकाळी सहा वाजता साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी सुरू होईल. तर साईबाबा संस्थानतील हत्या झालेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना संस्थान मदत करणार आहे. शिर्डीत एकाचदिवसात पहाटेच्यावेळी तीन वेगवेगळ्या चाकू हल्ल्याच्या घटना घडल्याने शिर्डीत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. ते शिर्डी साई संस्थानमध्ये नोकरीला होते. सुभाष घोडे हे करडोबा नगर चौकाचे तर नितीन कृष्णा शेजुळ साकुरी शिवचे रहिवासी आहेत.
Published on: Feb 04, 2025 05:13 PM