Published on
:
04 Feb 2025, 2:02 pm
Updated on
:
04 Feb 2025, 2:02 pm
सोलापूर : मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दीचे नियोजन करण्यासाठी सीएसएमटी- हैदराबाद आणि सीएसएमटी-हैदराबाद हुसेनसागर एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या संरचनेमुळे प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल. हे बदल तात्पुरत्या कालावधीसाठी असतील.
लग्न समारंभानिमित्त, आगामी सण, उत्सव आणि बाहेरगावी फिरायला जाण्यासाठी बहुसंख्य नागरिक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे नियमित प्रवाशांसह वाढीव गर्दी होते. ही गर्दी विभाजित करण्यासाठी रेल्वेगाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत सुधारणा केली आहे.
हैदराबाद ते सीएसएमटी एक्स्प्रेसला 28 फेब्रुवारीपर्यंत आणि सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेसला तीन मार्चपर्यंत सुधारित संचनेनुसार धावेल. तर सीएसएमटी ते हुसेनसागर एक्स्प्रेसला एक मार्चपर्यंत आणि हैद्राबाद-सीएसएमटी हुसेनसागर एक्स्प्रेसला दोन मार्चपर्यंत सुधारित संरचनेनुसार धावेल. या दोन्ही रेल्वे गाडीला सुधारित संरचनेनुसार तीन वातानुकूलित द्वितीय डबे, सात वातानुकूलित तृतीय डबे, दोन शयनयान, दोन जनरल सेकंद, एक सेकंड सीटिंग कम ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार अशी 16 डबे असतील.