नाशिक मर्चंट बँकेतील 12 खात्यांतून 100 कोटींपेक्षा अधिक संशयास्पद व्यवहार:सोमय्यांनी व्होट जिहादचा आरोप करताच 23 ठिकाणी ईडीचे धाडसत्र

6 days ago 2
बेनामी व्यवहार प्रकरणातील मालेगावचा मास्टमाइंड सिराज अहमद याचा केवळ १४० चाैरस फुटी दुकानात व्यवसाय आहे. त्याने स्वत:च्या खात्यात पैसे न टाकता त्याच्याकडे माल पाेहोचवण्यासाठी येणाऱ्या टेम्पाेचालकाला आमिष दाखवले व त्याच्या मित्रांना प्रत्येकी ५ हजार रुपये देत त्यांच्या नावाने बँक खाते उघडले. याच खात्यांत ११२ काेटी जमा झाले. त्यानंतर सिराजने आणखी जवळच्या मित्रांच्या खात्यात काही पैसे ट्रान्सफर करत ५० काेटी सुरत, ५० काेटी अहमदाबाद तर २५ काेटी मुंबईच्या एका ट्रेडिंग कंपनीच्या खात्यात वर्ग केले. तिथून हवालामार्फत व्यवहार केल्याचे दिसून येत आहे. नेमके काेणत्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाले आणि तेही आचारसंहिता काळात कसे काढण्यात आले, त्याचा वापर नेमका कशासाठी केला जाणार हाेता याची चौकशी एनआयए करणार आहे. मक्याचा व्यवसाय सांगून १२ बेरोजगारांना फसवले मक्याचा व्यवसाय करायचा असून त्यासाठी शेतकऱ्यांकडून पैशांची देवाणघेवाण होईल असे सांगून १२ बेरोजगार तरुणांना आमिष दाखवत मुख्य आरोपीने त्यांची नामको बँकेत खाती उघडण्यासाठी केवायसी तपशील (पॅन, आधार आदी) घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतरही आरोपीने त्याच्या मित्रांकडून केवायसी कागदपत्रे घेऊन आणखी दोन खाती उघडली. ही १४ खाती सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान उघडण्यात आली होती. संबंधित तरुणांनी सर्व खाती गाेठवली आहेत. नाशिक, मालेगाव, अहमदाबाद विधानसभा निवडणुकीत व्हाेट जिहादसाठी राज्यात १२५ कोटी रुपये अाले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी मालेगाव, नाशिक, मुंबईसह गुजरातेतील अहमदाबाद, सुरत शहरासह एकूण २३ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाडी टाकल्या. नाशिक मर्चंट सहकारी बँकेत सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात एकूण १४ खात्यांतून १०० कोटींच्या वर हवाला व्यवहार झाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले असून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी ईडीने धाडसत्र राबवल्याचे सूत्रांनी सांगितले. बँक खात्याचा गैरवापर झाल्याची तक्रार पोलिसांनी मिळाली होती. पैशांच्या बदल्यात मते मिळवण्यासाठी या बँक खात्यातून बेकायदा व्यवहार झाल्याचा आरोप १२ तक्रारदारांनी केला होता. त्यानंतर मालेगाव येथील चहा आणि शीतपेयाची एजन्सी असलेला व्यापारी सिराज अहमद हारुण मेमन आणि त्याच्या काही सहकाऱ्यांविरोधात मालेगाव पोलिसांनी गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल केला होता. त्याआधारे ईडीच्या पथकाने मालेगाव शहरातील आनंदनगर व गांधी मार्केट भागात छापेमारी केली. हवाला एजंट मिलीन पाेपटलाल पटेल व चहा एजन्सी व्यावसायिक उर्वरित. पान ८ व्होट जिहादसाठी १२५ कोटींचे व्यवहार लोकसभा निवडणुकीत मालेगावात भाजप उमेदवाराला केवळ १०० मते, तर काँग्रेसच्या उमेदवारास १ लाख ९४ हजार मते मिळाली होती,असा आरोप करून मालेगावात अाक्रमक ‘व्होट जिहाद’ सुरू असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ११ नोव्हेंबर रोजी केला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हाच प्रकार सुरू असून या संदर्भात त्यांनी ईडीसह सीबीआय,रिझर्व्ह बँक,आयकर विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. राज्यात व्होट जिहादसाठी १२५ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार झाल्याचा अारोप सोमय्यांनी केला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article