निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. यात पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे.
नाशिक
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आज राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. यात पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे.
बातमी अपडेट होत आहे…