मोठी बातमी समोर येत आहे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जेडीयुनं मणिपूरमध्ये भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे.
मोठी बातमी समोर येत आहे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जेडीयूनं मणिपूरमध्ये भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे. मणिपूरमध्ये जेडीयूचे सहा आमदार निवडून आले होते. मात्र त्यातल्या पाच आमदारांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर जो एक आमदार जेडीयूमध्ये होता, त्यानं भाजपला दिलेला आपला पाठिंबा मागे घेतला आहे. राज्यात जेडीयूचे सहा आमदार होते, त्यातील पाच जण आधीच भाजपच्या गोटात आले आहेत. त्यामुळे जरी मणिपूरमध्ये जेडीयूनं भाजपचा पाठिंबा काढला असला तरी सरकारला कुठलाही धोका नाही, सरकार स्थिर आहे.